LSG vs MI Eliminator IPL 2023 | आकाश मढवाल याचा ‘पंच’, मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक, लखनऊवर 81 धावांनी मोठा विजय

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच विजय मिळवत क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली आहे. मुंबईने लखनऊवर 81 धावांनी मात केली आहे.

LSG vs MI Eliminator IPL 2023 | आकाश मढवाल याचा 'पंच', मुंबईची क्वालिफायर 2 मध्ये धडक, लखनऊवर 81 धावांनी मोठा विजय
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 11:55 PM

तामिळनाडू | मुंबई इंडियन्स टीमने लखनऊ सुपर जायंट्स संघावर 81 धावांनी धमाकेदार असा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर आणि फिल्डिंगसमोर लखनऊचा बाजार 16.3 ओव्हरमध्ये 101 धावांवर उठला. लखनऊला ऑलआऊट फक्त 101 धावाच करता आल्या. आकाश मढवाल हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मढवालने निर्णायक क्षणी लखनऊनला झटके दिले. मढवालने एकूण 5 विकेट्स घेतल्या. तर मुंबईने शानदार फिल्डिंग करत लखनऊच्या 3 फलंदाजांना रन आऊट केलं.

गुजरातची बॅटिंग

गुजरात टीमची 183 धावांची पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. मुंबईने लखनऊला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. लखनऊकडून फक्त तिघांनी दुहेरी आकडा गाठला. मार्कस स्टोयनिस याने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. ओपनर कायले मेयर्स याने 18 धावा केल्या. तर दीपक हुड्डा 15 धावा करुन रनआऊट झाला.

या तिघांव्यतिरिक्त पलटणच्या गोलंदाजांनी लखनऊच्या एकाही बॅट्समनला दुहेरी आकडा गाठू दिला नाही. प्रेरक मंकड 3 धाव करुन बाद झाला. कॅप्टन कृणाल पंड्या 8 रन्स करुन माघारी परतला. आयुष बदोनीने 1 धाव केली. निकोलस पूरन याला भोपळाही फोडता आला नाही. के गौथम 2 धावांवर आऊट झाला. रवि बिश्नोई याने 3 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मोहसिन खान झिरोवर आऊट झाला. तर नवीन उल हक हा 1 धावेवर नाबाद राहिला.

मुंबईकडून आकाश मढवाल याने 3.3 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस जॉर्डन आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मुंबईची बॅटिंग

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. मुंबईकडून ख्रिस जॉर्डन याचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र कुणा एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 41 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादव याने 33 धावांचं योगदान दिलं.

तिळक वर्मा याने 26 धावा जोडल्या. नेहल वढेरा याने अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 23 धावांची खेळी केली. इशान किशन 15 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन रोहित शर्माने 11 धावा केल्या. टीम डेव्हिडने 13 धावा जोडल्या. ख्रिस जॉर्डन 4 धावा करुन आऊट झाला. हृतिक शौकीन शून्यावर नाबाद रहिला.

लखनऊकडून नवीन उल हक याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नवीनने एकाच ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना आऊट करत मुंबईला बॅकफुटवर ढकललं. तर नवीन व्यतिरिक्त यश ठाकूर या युवा गोलंदाजाने पुन्हा आपली छाप पाडली. यशने 3 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खानने 1 विकेट घेतली.

मुंबईची दुसऱ्यांदा क्वालिफायर 2 मध्ये धडक

मुंबईने या विजयासह क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली आहे. मुंबईची एलिमिनेटर खेळण्याची ही चौथी वेळ होती. मुंबईने याआधी 2011, 2012 आणि 2014 मध्ये एलिमिनेटर सामना खेळला होता. मुंबईने 2011 मध्ये एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर 4 विकेट्सने विजय मिळवत क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी एलिमिनेटर जिंकण्याची कामगिरी मुंबईने केली आहे. मुंबईला 2012 आणि 2014 साली एलिमिनेटर सामन्यात चेन्नईकडूनच पराभूत व्हावं लागलं होतं.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.

Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.