तिलक वर्माला Retired Out करत मैदानाबाहेर पाठवण्यावरुन बवाल, कॅप्टन हार्दिक निर्णयाबाबत म्हणाला…
Hardik Pandya On Tilak Varma Retired Out : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तोडफोड बॅटिंग करुन टीम इंडियाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या तिलक वर्माला आयपीएल स्पर्धेत रिटायर्ड हर्ट करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या निर्णयावरुन क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने शुक्रवारी 4 एप्रिलला मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी मात केली. मुंबईची 204 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. मुंबईने पहिल्याच 3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. नमन आऊट झाल्यानंतर सूर्यकुमारने तिलक वर्मा (इमपॅक्ट प्लेअर) याच्यासह मुंबईला 150 पार पोहचवलं. तिलकने या दरम्यान संथ खेळी केली. त्यामुळे तिलकला 19 व्या ओव्हरदरम्यान रिटायर्ड आऊट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. निर्णायक क्षणी घेतलेला हा निर्णय अनेकांना पटला नाही.
तिलकने 23 बॉलमध्ये 25 धावा केल्या. तिलकने या खेळीत 2 चौकार लगावले. सूर्या आऊट झाल्यानंतर तिलक टॉप गिअरमध्ये फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्यावर दबाव वाढला. त्यानंतर तिलक वर्मा 19 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर रिटायर्ड आऊट होऊन मैदानाबाहेर गेला. तिलकला अशाप्रकारे मैदानाबाहेर जाताना पाहून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिलनंतर मिचेल सँटनर मैदानात आला. तिलकला अशाप्रकारे मैदानाबाहेर पाठवण्याच्या निर्णयावरुन मुंबई टीमवर टीका केली जात आहे. सूर्यकुमार यादवनेही याबाबत नाराजी व्यक्त केली. सूर्याने या मुद्द्यावरुन प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासह चर्चा केली.
तिलकबाबत असा निर्णय घेऊनही काही फायदा झाला नाही. शार्दुल ठाकुर याने 19 व्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये 5 रन्स दिल्या. त्यानंतर तिलकबाबत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सँटनरने 2 धावा केल्या.
तिलक वर्मा रिटायर्ड हर्ट आऊट
Hell Nawww!!!😭😭🙏🏻🙏🏻
MI management has retired tilak verma that too in place of santner.
I still remember those days, when this mug used to get compared from his baap kohli.😹🙏🏻
Shame of a knock.#IPL2025 #LSGvMI pic.twitter.com/sh3f8ivhuu
— U’ (@utkarsh_tweetz) April 4, 2025
मुंबईला त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज होती. तेव्हा हार्दिकने आवेश खानच्या बॉलिंगवर खणखणीत सिक्स लगावला. मात्र त्यानंतर आवेशने कमबॅक करत हार्दिकला शेवटच्या 5 बॉलमध्ये मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. लखनौने अशाप्रकारे मुंबईवर 12 धावांनी मात केली. तसेच हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये सँटरनला स्ट्राईकही दिली नाही. त्यामुळे तिलकला अशाप्रकारे मैदानाबाहेर पाठवून काय सिद्ध केलं? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
कर्णधार हार्दिक सामन्यानंतर काय म्हणाला?
दरम्यान कर्णधार हार्दिकने सामन्यानंतर या सर्व प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्हाला काही मोठ्या फटक्यांची गरज होती. क्रिकेटमध्ये काही दिवस असे असतात जेव्हा मोठे फटके लागत नाहीत. चांगलं क्रिकेट खेळा. मी हे सोपं ठेवू इच्छितो. चांगले निर्णय घेणं मला आवडतं”, असं हार्दिकने म्हटलं.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.