LSG vs RCB Prediction Playing XI IPL 2022: लखनौमधून परदेशी गोलंदाजाला डच्चू, डुप्लेसीची टीम जैसे थे!
यंदाच्या आयपीएल 2022 स्पर्धेत नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या संघाचा मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL 2022) मुकाबला होणार आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएल 2022 स्पर्धेत नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या संघाचा मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL 2022) मुकाबला होणार आहे. स्पर्धेतील 31 व्या सामन्यात हे दोन तगडे संघ भिडतील. लखनौचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul), सलामीवीर क्विंटन डी कॉक, दीपक हूडा शानदार फॉर्ममध्ये आहेत तर बँगलोरचे फलंदाज दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासमोर भले-भले गोलंदाज निष्प्रभ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मागील सामन्यात राहुलच्या संघाने मुंबई इंडियन्सचा तर डुप्लेसिसच्या बँगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. दोन्ही संघांचे सहा सामन्यांत आठ गुण आहेत आणि त्यांना विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. या मोसमात दोन्ही संघांनी आतापर्यंत अप्रतिम खेळ दाखवला आहे. लखनौसाठी हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा संघदेखील चांगल्या फॉर्मात आहे.
गेल्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. बहिणीच्या निधनामुळे हर्षल पटेल काही सामने खेळू शकला नाही, मात्र त्याने शेवटच्या सामन्यात पुनरागमन केले. संघात कोणताही बदल झालेला दिसत नाही. अनुज रावत चांगला खेळत असून शाहबाज अहमदनेही प्रभावित केले आहे. या मोसमात दिनेश कार्तिकने धुमाकूळ घातला असून, फिनिशरची जबाबदारी पार पाडत त्याने संघाला अनेकवेळा संकटातून बाहेर काढले आणि विजयाचा उंबरठा ओलांडला.
हा खेळाडू लखनौच्या संघाबाहेर जाणार!
लखनौच्या संघाने शेवटचा सामनाही जिंकला आणि संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली, तरीही वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा चांगलाच महागात पडला. त्याने 12 च्या सरासरीने धावा दिल्या होत्या आणि चार षटकात 48 धावा दिल्या होत्या. त्याबदल्यात त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. अशा स्थितीत राहुल त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या गोलंदाजाला संधी देऊ शकतो. अँड्र्यू टाय त्याची जागा घेऊ शकतो. मनीष पांडेला संधी देण्यात आली आणि त्याने 38 धावांची खेळी करत पुढील सामन्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
उभय संघांची प्लेईंग 11
- रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज.
- लखनौ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
इतर बातम्या