लखनौ : भारतीय क्रिकेट टीमचा अनुभवी बॅट्समन आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलबाबत एक चांगली बातमी नाहीय. आधीच केएल राहुलचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. आता त्याच्या पायाला दुखापत झालीय. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, लखनौचा कॅप्टन केएल राहुल आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार नाहीय. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत सुद्धा फिट होण्याची शक्यता कमी आहे.
1 मे रोजी केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो अखेरीस बॅटिंगसाठी उतरला होता. धावताना त्याला त्रास होत होता. 3 मे रोजी बुधवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यावेळी केएल राहुल टीमसोबत होता. पण तो या मॅचमध्ये खेळत नव्हता.
NCA ला जास्त अपेक्षा नाही
या दुखापतीनंतरच केएल राहुल आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, तो आता आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीय. चेन्नई विरुद्धच्या सामन्यानंतर राहुल टीमची साथ सोडून मुंबईला रवाना झाला. मुंबईत त्याच्या दुखापतग्रस्त भागाच स्कॅनिंग होईल. त्यानंतरच तो पुढच्या महिन्यात WTC फायनलमध्ये खेळणार की, नाही ते स्पष्ट होईल.
Wishing a speedy recovery to @klrahul
See you back on the field soon ????#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/2DPo7W2OuK
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2023
WTC फायनल कधी?
बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीतील मेडिकल टीम राहुलच्या फिटनेसबद्दल जास्त आशावान नाहीय. 7 जूनपासून लंडनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या WTC फायनलपर्यंत तो पूर्ण फिट होणार नाही, असंच म्हटलं जातय.
केएल राहुल बरोबर आणखी एका खेळाडूच्या दुखापतीमुळे टेन्शन
जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर आधीच दुखापतग्रस्त आहेत. आता केएल राहुलची दुखापत टीम इंडियासाठी झटका आहे. राहुलच नाही, जयदेव उनाडकटच्या दुखापतीमुळे सुद्धा टेन्शन आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज उनाडकट बाहेर गेलाय. तो WTC फायनलपर्यंत फिट होईल का? या बद्दल चित्र स्पष्ट नाहीय.