LSG vs DC : दिल्ली कॅपिटल्स संघाने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची playing 11

आयपीएलला सुरूवात झाली असून तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी लखनऊ येथील एकना क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होत आहे.

LSG vs DC : दिल्ली कॅपिटल्स संघाने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांची playing 11
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:19 PM

मुंबई : आयपीएलला सुरूवात झाली असून तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी लखनऊ येथील एकना क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. के.एल. राहुल लखनऊ सुपरजायंट्सचे कर्णधारपद भूषवत असून, तर ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आली आहे. दिल्ली संघाने टॉस जिंकला असून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी धावांचा पाठलाग करणं गरजेचं आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा निर्णय गोंधळात टाकणारा असू शकतो पण तणावपूर्ण स्थितीत इम्पॅक्ट प्लेयरची भूमिका महत्त्वाची ठरणार असून खेळण्यास मी उत्सुक असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.

लखनऊने आयपीएल 2022 मध्ये एलिमिनेटरपर्यंत प्रवास केला होता, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डिकॉकने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या मोसमात त्याने 15 सामन्यात 508 धावा केल्या होत्या. मात्र, चालू मोसमातील पहिल्या काही सामन्यांसाठी डी कॉक उपलब्ध नाही, त्यामुळे लखनऊची ओपनिंगसाठी डोकेदुखी वाढली आहे.

कर्णधार डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे. वॉर्नरशिवाय कुलदीप यादवच्या फिरकीने चमत्कार घडवला, तर प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता शोधत. त्यासोबतच मिचेल मार्श, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल आणि चेतन साकारिया यांच्यावरही नजर असणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (C), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (W), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.