IPL आयोजनासाठी महाराष्ट्र सरकार BCCI च्या मदतीला, संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असणार

IPL 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात (IPL 2022 Opening Match) भिडतील.

IPL आयोजनासाठी महाराष्ट्र सरकार BCCI च्या मदतीला, संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असणार
Sourav Ganguly - jay shahImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 2:44 PM

मुंबई : IPL 2022 मधला पहिला सामना 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) हे आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात (IPL 2022 Opening Match) भिडतील. चेन्नई सुपरकिंग्स हा संघ सध्या गतविजेता आहे. आत्तापर्यंत असे दिसून आले आहे की, आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी नेहमीच गतविजेत्या संघाला मिळते. त्यामुळे CSK ची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ गतवर्षी उपविजेता ठरला होता. हा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) पहिल्या सामन्यात चेन्नईशी दोन हात करणार आहे. यावेळी आयपीएलचे लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यातच खेळवले जाणार आहेत. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ आहेत आणि ते प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागले गेले आहेत. सर्व संघ आपापसात किमान एक सामना नक्कीच खेळतील.

इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसने लिहिले आहे की, आयपीएल 2022 च्या सामन्यांदरम्यान, संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 55 सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.

आयपीएलसाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला मदत करणार

महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला आयपीएल सामने आणि प्रशिक्षणाबाबत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याअंतर्गत संघांना स्वतंत्र रोड लेन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एमसीएच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर म्हणाले की, बीसीसीआयसोबत 26 फेब्रुवारीला बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. नार्वेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देईल. मैदानात प्रेक्षकांच्या येण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

एका हॉटेलमध्ये दोन संघ थांबतील

महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात परवानगी देऊ शकते, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचवेळी बीसीसीआयने दोन संघांना एकाच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी 10 संघ असल्याने संघांसाठी पाच पंचतारांकित हॉटेल्स बुक करावी लागणार आहेत. राज्य सरकार स्पर्धेतील बायो बबल आणि कोविड टेस्टिंगमध्ये मंडळाला मदत करेल.

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.