Dhoni New Look | महेंद्रसिंह धोनीचा नव्या वर्षातील नवा हटके लूक पाहिलात का ?

महेंद्रसिंह धोनीचा नवा लूक (Mahendra Singh Dhoni) व्हायरल झाला आहे.

Dhoni New Look | महेंद्रसिंह धोनीचा नव्या वर्षातील नवा हटके लूक पाहिलात का ?
महेंद्रसिंह धोनी
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:37 PM

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमानंतर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे धोनी सध्या काय करतोय, याची कोणालाच माहिती नाही. मात्र धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारणही तसंच आहे. धोनीचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीच्या अनेक चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धोनीचा नवा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. धोनीने एका जाहिरातीसाठी आपला लूक बदलला आहे. (Mahendra singh dhoni new look viral on social media)

असा आहे धोनीचा लूक

धोनीने त्याची हेअरस्टाईल बदलली आहे. धोनीला ही नवी हेअरस्टाईल शोभून दिसतेय. तसेच त्याने आपली पांढरी दाढी काढून टाकली आहे. या फोटोमध्ये धोनी एकदम कुल वाटतोय. धोनीने गेल्या वर्षभरात अनेकदा आपला लूक बदलला आहे. त्यामुळे धोनीची ही नवी स्टाईल त्याचे फॅन्स लवकरच फॉलो करताना दिसतील.

धोनीचा नवा लूक

आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

धोनीने गेल्यावर्षी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो आयपीएलच्या 13 व्या मोसमात खेळताना दिसला होता. धोनी आणि चेन्नई सुपर किंगज्सची आयपीएलच्या 13 पर्वात फार निराशाजनक कामगिरी राहिली. चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीमपैकी एक आहे. चेन्नईने आयपीएलच्या सुरुवातीपासून प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला. पण 13 व्या हंगामात चेन्नईचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आलं. यामुळे या आगामी मोसमात दमदार कामगिरी करण्याचा मानस चेन्नईचा असणार आहे. या आगामी मोसमासीठी चेन्नईने एकूण 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.

चेन्नईने कायम ठेवलेले खेळाडू

फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, एन. जगदीसन, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, लुंगी एनगीदी, इमरान ताहीर, जोश हेजलवुड, मोनू कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर, के.एम. आसिफ, शेन वॉटसन, करन शर्मा, मिशेल सॅटनर

चेन्नईने रिलीज केलेले खेळाडू  : हरभजन सिंग, मुरली विजय, पियुष चावला आणि केदार जाधवला संघातून मुक्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

M S Dhoni | शिवारातून थेट परदेशवारी, धोनीने पिकवलेल्या भाज्यांची दुबईत विक्री

MS Dhoni | निवृत्तीनंतर महेंद्रसिंग धोनी कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात, 2 हजार पिलांची ऑर्डरही दिली

(Mahendra singh dhoni new look viral on social media)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.