“मैंने खुद को उल्लू बनाया…”, सूर्यकुमार यादव याने तिलक वर्मा याला सांगितलं आक्रमक खेळीचं गुपित
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव चमकला. त्याच्या आक्रमक खेळीबाबत तिलक वर्मा याने त्याला प्रश्न विचारला आणि त्याला दिलखुलासपणे उत्तर दिलं.
मुंबई : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने तिसरा सामना जिंकत कमबॅक केलं आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढचे दोन्ही सामने काहीही करून भारताला जिंकावे लागणार आहेत. तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 44 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यावेळी त्याला मैदानात तिलक वर्मा याची साथ लाभली. तिलक वर्मा यानेही नाबाद 49 धावांची खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याशी तिलक वर्मा याने संवाद साधला. बीसीसीआय टीव्हीवर बोलताना सूर्यकुमार यादव याने दिलखुलासपणे उत्तर दिलं.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात काय संवाद झाला?
“लोकांना मी एक गोष्ट सांगू इच्छित आहे.सूर्याच्या विशबँडमध्ये होतं की पॉवरप्लेमध्ये थोडा वेळ घेऊन खेळायचं आहे. पण मला हे समजलं नाही की पहिल्या चेंडूपासून सुरु झाला. यामागचं कारण काय?”, असा प्रश्न तिलक वर्मा याने विचारला.
तिलक वर्मा याने सूर्यकुमार यादव विचारलं की, तू जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा नेमका काय विचा करत होता. यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “मी इथे विचार करून आलो होतो की आरामात खेळेन. पण पहिल्याच चेंडूवर चौकार आला आणि मी माझं मन बदललं. डोक्यात काही वेगळाच विचार करून आलो होतो, पण मी स्वत:ला उल्लू बनवलं.”
Maturity with the bat ✨Breathtaking shots ? What's the wrist band story ?
Get to know it all in this special and hilarious chat from Guyana ft. @surya_14kumar & @TilakV9 ?? – By @ameyatilak
Full Interview ?? #TeamIndia | #WIvIND https://t.co/7eeiwO8Qbf pic.twitter.com/TVVUvV3p7g
— BCCI (@BCCI) August 9, 2023
तिलक वर्मा याने पुढे सांगितलं की, “एक बाब अजून विचारायची आहे की स्लो विकेटवर स्क्वेअर लेगच्या वरून पॉवर जनरेट केली. बाकी सर्व शॉट्स मी आयपीएलमध्ये पाहिले आहेत. पण स्क्वेअर लेगवरून स्लो विकेटवर मारणं कसं शक्य झालं, मला कळलं नाही.” यावर सूर्यकुमार उत्तर देताना म्हणाला की, “तुम्हाला हे आरामात सांगतो. तुम्ही सर्वांनी हे बघितलं असेलच. याला ड्रेसिंग रुममध्ये आरामात सांगतो.”
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 मालिकेतील दोन सामने अजून शिल्लक आहेत. या मालिकेतील चौथा साना 12 ऑगस्टला फ्लोरिला खेळला जाणार आहे.