CSK : अंबाती रायडू, ब्राव्हो परत एकदा चेन्नईकडून उतरणार मैदानात, चाहते झाले खूष
2019 साली रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि 2023 ला आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली. पण त्याने आता मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : यंदाच्या मोसमात आयपीएलमधील स्टार खेळाडू अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली होती. 2019 साली रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती त्यानंतर चार वर्षे आयपीएल खेळत त्याने क्रिकेटला रामराम केला. गडी आता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत असताना त्याने आता मोठा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू अंबाती रायडू आता परदेशी लीगमध्ये खेळणार आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्जकडून खेळणार आहे. रायुडूने इंस्टाग्रामवर पिवळ्या जर्सीतील एक फोटो शेअर केला आहे. ही टेक्सास सुपर किंग्जची जर्सी आहे. रायुडूसोबतच टेक्सासनेही ट्विट करून त्याचा संघात समावेश झाल्याची माहिती दिली.
रायुडूसोबत या संघात ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर आणि डेव्हन कॉनवे देखील आहेत. कॉनवे देखील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे. ब्राव्हो सीएसकेकडूनही बराच काळ खेळला आहे. आता हे सर्व खेळाडू मेजर लीग क्रिकेट आपलं शक्ती प्रदर्शन करतील.
टेक्सास सुपर किंग्ज संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडे दिली आहे. ब्राव्होचा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. तो बऱ्याच दिवसांनी खेळताना दिसणार आहे. संघात डॅनियल सॅम्स, संँटनर, कॉनवे यांचाही खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, टेक्सासने फ्लेमिंगला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षकपद एरिक सिमन्स यांच्याकडे देण्यात आले आहे. एलबी मॉर्केल हे सहाय्यक प्रशिक्षकही आहेत. फ्लेमिंग हे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षकही आहेत. अलीकडेच चेन्नईने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे.