Video : तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये रविचंद्रन अश्विनलाच दिली मंकडिंगची वॉर्निंग! झालं असं की..
तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत डिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेलई रॉयल किंग्स यांच्यात सामना पार पडला. डिंडीगुल ड्रॅगन्सने विजयासाठी फक्त 136 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान नेलई रॉयल किंग्सने 17.5 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात आर अश्विनसोबत मंकडिंगचा प्रकार घडला. काय झालं ते वाचा आणि पाहा
तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत डिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेलई रॉयल किंग्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल नेलई रॉयल किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डिंडीगुल ड्रॅगन्सची स्थिती पहिल्या षटकापासून नाजूक झाला. थोड्या थोड्या धावांच्या अंतराने विकेट पडत होते. विमल खुमार, बाबा इंद्रजित, बूपती वैष्णा कुमार, सारथ कुमार, दिनेश राज एस, वरुण चक्रवर्थी, सुबोथ भाटी एकेरी धावांवर तंबूत परतले. पण शिवम सिंगने एका बाजूने किल्ला लढवणं सुरुच ठेवलं होतं. पण त्याला नॉन स्ट्राईकवरून कोणाची साथ मिळत नव्हती. ओपनिंगला आलेल्या शिवम सिंगने 59 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. त्याला आर अश्विनची साथ मिळेल असं वाटत होतं. त्याने 13 चेंडूत 15 धावा केल्या होत्या. पण रनआऊट होत तंबूत होत परतला. यावेळी एक वेळ अशी आली की आर अश्विन मंकडिंगचा शिकार होतो की काय?
डिंडीगुल ड्रॅगन्सची 97 धावांवर 6 विकेट अशी स्थिती होती आणि आर अश्विन मैदानात आला. तर नेलई रॉयल किंग्सकडून 15 वं षटक टाकण्यासाठी मोहन प्रसाथ मैदानात आला होता. यावेळी त्याने पहिला चेंडू शिवम सिंगला टाकला, पण त्यावर धाव आली नाही. पण दुसरा चेडू टाकताना मात्र मोहन प्रसाथ थांबला आणि अश्विन क्रिस सोडत असल्याचं दाखवून दिलं. इतरवेळी अशी खेळी अश्विन इतरांसोबत करताना दिसला आहे. तसेच विकेटही घेतली आहे. आज त्यालाच मंकडिंगची वॉर्निंग मिळाली.
A Warning to Ravichandran Ashwin at the non-striker end in TNPL. 😀 pic.twitter.com/CMqwJxoiQz
— Johns. (@CricCrazyJohns) July 28, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
डिंडीगुल ड्रॅगन्स (प्लेइंग इलेव्हन): विमल खुमर, शिवम सिंग, बाबा इंद्रजीथ (विकेटकीपर), सी सरथ कुमार, रविचंद्रन अश्विन (कर्णधार), बूपती कुमार, एस दिनेश राज, सुबोथ भाटी, वरुण चक्रवर्ती, पी विघ्नेश, व्हीपी दिरान
नेल्लई रॉयल किंग्स (प्लेइंग इलेव्हन): लक्ष्मेशा सूर्यप्रकाश, अजितेश गुरुस्वामी (कर्णधार), निधिश राजगोपाल, एसजे अरुण कुमार, रितिक इसवरन (विकेटकीपर), सोनू यादव, एनएस हरीश, एन काबिलन, एस मोहन प्रसाथ, आर सिलांबरसन, जे रोहन.