Retirement : पहिल्या टी-20 आधी टीम इंडियाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची झटक्यात निवृत्ती
Cricket Retirement : आगामी आशिया कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट संतुलित संघ बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहेत. आधीच टीम इंडियासमोर अडचणी असताना एका स्टार खेळाडूने निवृत्ती आहे.
मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून आता टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. आधी कसोटी आणि वन डे सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आगामी आशिया कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट संतुलित संघ बनवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार आहेत. आधीच टीम इंडियासमोर अडचणी असताना एका स्टार खेळाडूने निवृत्ती आहे.
कोण आहे तो खेळाडू?
टीम इंडियाचा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनोज तिवारी आहे. मनोज तिवारीने सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र टीम इंडियामध्ये तो जास्त वेळ आपलं स्थान टिकवू शकला नाही. जवळपास गेली 8 वर्ष मनोज तिवारी टीम इंडियाच्या संघात नाही. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी मनोज तिवारी ओळखला जातो. इतकंच नाहीतर मनोज तिवारी हा सध्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.
View this post on Instagram
2015 साली टीम इंडियाकडून मनोज तिवारीने शेवटचा सामना खेळला होता. 2008 ला त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे सामन्यामध्ये डेब्यू केला होता. 12 वन डे सामने आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये मनोज तिवारीने भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. यामधील वन डे सामन्यामध्ये 287 धावा केल्या होत्या यामध्ये 1 शतक मारलं होतं. तर टी-20 सामन्यामध्ये 15 च्या सरासरीने 5 धावा केल्या आहेत.
दरम्यान, मनोज तिवारी आयपीएलमध्येही खेळला असून त्याने कोलकाता नाईट रायडर्स, पुणे सुपरजायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये 98 सामने खेळताना 28.72 च्या सरासरीने 1695 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 अर्धशतके केली आहेत.