Retirement | ‘माझ्यातही रोहित आणि विराट इतकीच क्षमता पण धोनीने…’; तगड्या खेळाडूचा निवृत्ती घेत माहीवर गंभीर आरोप

फेब्रुवारी महिन्यात बड्या खेळाडूंनी क्रिकेटला रामराम ठोकलाय. चार खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला असताना आता पाचव्या खेळाडूनेही निवृत्तीचा निर्णय घेतलाय. इतकंच नाहीतर या खेळाडूने धोनीवर गंभीर आरोप केलेत.

Retirement | 'माझ्यातही रोहित आणि विराट इतकीच क्षमता पण धोनीने...'; तगड्या खेळाडूचा निवृत्ती घेत माहीवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 7:39 PM

मुंबई : टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीये. या खेळाडूने निवृत्ती जाहीर करताना टीम इंडियाचा माजी आणि सर्वात यशस्वी ठरलेला कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्यावर गंभीर आरोप केलेत. धोनीने आपल्याला संघात स्थान दिलं नाही. मीपण आज विराट कोहली आणि रोहित शर्मसारखा तगडा खेळाडू असतो, असं म्हणत या खेळाडूने धोनीवर निशाणा साधला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनंतरही त्याला संघात जागा मिळाली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनोज तिवारी आहे. मनोज तिवारी याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने धोनीवर गंभीर आरोप केला आहे. कोलकातामधील स्पोर्ट्स जर्नलिस्ट क्लबमध्ये सत्कार समारंभावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.

मनोज तिवारी याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध नाबाद 104 धावांची दमदार खेळी केली होती. 12 वन डे सामन्यांमध्ये मनोज तिवारी याने 287 धावा केल्या होत्या. माझ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंप्रमाणे प्रतिभा होती. माझ्यात हिरो बनण्याची तेवढी क्षमता होती. आज जेव्हा तरूण खेळाडूंना संधी दिली जाते तेव्हा मला दु:ख होत असल्याचं मनोज तिवारी याने म्हटलं आहे.

वरूण अॅरोन, सौरभ तिवारी फैज फजल, धवल कुलकर्णी यांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारी हा पाचवा खेळाडू आहे ज्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. याआधीही मनोज कुमार याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याने परत एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता परत एकदा मनोजने क्रिकेटला अलविद म्हटलं आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.