Marco Jansen, IPL 2022 Auction: सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्सच्या लढाईत दोन सामने खेळणारा क्रिकेटपटू बनला कोट्यधीश

| Updated on: Feb 13, 2022 | 2:31 PM

Marco Jansen, IPL 2022 Auction: TATA IPL 2022 Mega Auction मध्ये आज दक्षिण आफ्रिकेच्या एका वेगवान गोलंदाजासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये बिडींग वॉर पहायला मिळालं.

Marco Jansen, IPL 2022 Auction: सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्सच्या लढाईत दोन सामने खेळणारा क्रिकेटपटू बनला कोट्यधीश
Image Credit Source: Twitter/MI
Follow us on

TATA IPL 2022 Mega Auction मध्ये आज दक्षिण आफ्रिकेच्या एका वेगवान गोलंदाजासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये बिडींग वॉर पहायला मिळालं. पण अखेर सनरायजर्स हैदराबादने बाजी मारली. मुंबई इंडियन्सला या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घ्यायचं होतं. कारण मागच्या सीजनमध्ये तो मुंबईकडून खेळला होता. सनरायजर्स हैदराबाद बरोबर त्या खेळाडूचा सुद्धा फायदा झाला. कारण SRH-MI च्या बीडींग वॉरमध्ये मार्को जॅनसेन (Marco jansen) कोट्यधीश बनला. सनरायजर्स हैदराबादने जॅनसनला चार कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या युवा गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं. त्याने भारतीय संघाला बराच त्रास दिला होता.

मार्को जॅनसेनला मुंबईने रिटेन केलं नव्हतं. पण मुंबई त्याच्यासाठी आज बोली लावणार याचा अंदाज होता आणि घडलं सुद्धा तसंच. मुंबईने आपल्या या पूर्व गोलंदाजासाठी बोली लावली पण सनरायजर्स हैदराबादने बाजी मारली.

IPL मध्ये मार्को जॅनसेन फक्त दोन सामने खेळला आहे. त्याने फक्त दोन विकेट घेतल्या आहेत. KKR विरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती. सध्या जॅनसेन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मायदेशात झालेल्या भारता विरुद्धच्या वनडे आणि टेस्ट सीरीजमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. त्या दृष्टीने सनरायजर्स हैदराबादला एक चांगला गोलंदाज मिळाला आहे.