IPL 2023 : महेंद्रसिंह धोनी याने 20 लाखांमध्ये करून दाखवलं ते 30 कोटी 25 लाखात नाही झालं, जाणून घ्या!
आयपीएलमधील यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे पाहिलं तर कोणीच म्हणणार नाही की हा संघ यशस्वी होईल. मात्र महेंद्रसिंह धोनी या एका खेळाडूने सर्व काही बदलून टाकलं आहे.
मुंबई : आयपीएलमधील यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. सीएसकेच्या संघाकडे पाहिलं तर कोणीच म्हणणार नाही की हा संघ यशस्वी होईल. मात्र महेंद्रसिंह धोनी या एका खेळाडूने सर्व काही बदलून टाकलं आहे. या संघात मोठे खेळाडू नाहीत पण धोनी असा मास्टर आहे की तो युवा खेळाडूला पण स्टार करतो. याची झलक तुम्ही पाहिली असेल पण सध्या सीएसकेचे 30 कोटी 50 लाख वाया गेल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे 20 लाखांमध्ये मोठा फायदा झाला आहे.
चेन्नईचा स्टार खेळाडू दीपक चहर याला संघाता रिटेन करत 14 कोटी सीएसकेने मोजले होते. मात्र तो जखमी झाल्यामुळे आता बेंचवर बसून आहे. त्यासोबतच चेन्नईचा बेन स्टोक्स याने 16.25 कोटी रूपये खर्च करत संघात बेन स्टोक्सला घेतलं होतं. मात्र तोसुद्धा आता बाहेर बसून आहे.
या खेळाडूंवर इतके पैसे लावूनही ते खेळू शकत नाहीत. दीपक आणि स्टोक्स संघात असते तर संघ आणखी बळकट झाला असता. दोघेही न खेळता संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 20 वर्षीय मथिसा पाथीराना याने चेन्नईसाठी अप्रतिम गोलंदाजी केली आहे.
In the air & taken! ??
Matheesha Pathirana puts an end to Andre Russell’s innings ☝️#KKR need 72 off 18
Follow the match ▶️ https://t.co/j56FWB88GA #TATAIPL | #KKRvCSK pic.twitter.com/iYoAqYzGvT
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2023
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात बंगळुरूला विजयासाठी 19 धावांची गरज होती. धोनीने पाथीरानावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि सामना जिंकवून दिला. पाथीरानाने आपल्या स्पेलमध्ये 4 ओव्हर्समध्ये 41 धावा देत 2 गडी बाद केले होते.
लसिथ मलिंगासारखी बॉलिंग अॅक्शन असलेला पाथिराना सर्वांनाच मलिंगाचा आठवण करून देतो. या मोसमात पाथीरानाने आपला दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता. या मोसमात आतापर्यंत पाथीरानाने एकूण तीन सामने खेळले असून चार विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. या दरम्यान त्यांची अर्थव्यवस्था 7.58 झाली आहे. आपल्या गोलंदाजीने त्याने धोनीचा विश्वास जिंकला आहे.