मंधानाची कमाल, रँकिंगमध्ये धमाल, ऑस्ट्रेलिया बेहाल
ICC Ranking : भारताची महिला क्रिकेटर स्मृती मंधाना ही सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिनं इंग्लंडमध्ये तिच्या फलंदाजीची दहशत निर्माण केली आहे. तिच्या कामगिरीनं तिनं रँकिंगमध्येही आगेकूच केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय स्टार महिला क्रिकेटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) एक मोठं यश मिळवलंय. ती सध्या चांगलीच फॉर्ममध्ये असून तिनं इंग्लंडमध्ये तिच्या फलंदाजीची इतकी दहशत निर्माण केली आहे की, तिनं आता ऑस्ट्रेलियाला (Australia) देखील धडकी भरवली आहे. आताच आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आयसीसी (ICC Ranking) रँकिंगमध्ये मंधानाची आगेकूच झाली आहे. ती आता दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. मंधानानं ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंगला दुसऱ्या स्थानावरुन हटवलं आहे.
आयसीसीचं ट्विट
100% Cricket Superstar Smriti Mandhana is on the rise in the latest @MRFWorldwide ICC Women’s Player Rankings ?
Details ?
— ICC (@ICC) September 20, 2022
मंधानाचा फॉर्म कायम
स्मृतीच्या या मोठ्या कामगिरीच्या मागे बरेच कष्ट देखील आहे. तिनं इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या टी-20 सीरिजमध्ये 111 धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे स्मृती मंधानाचा हा फॉर्म तिनं कायम ठेवला आहे. तिनं पहिल्या सामन्यात जी काही खेळी खेळली ती विशेष आहे. पण, यात तिला शतक पूर्ण करता आलं नाही.
स्मृतीची आगेकूच
स्मृती मंधानाची ही शानदार खेळी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी असली तरी तिनं यात आणखी एक मोठं काम केलं. ही तिची मोठी कामगिरी आहे, असंच म्हणावं लागेल. आयसीसीच्या रॅकिंगमध्ये स्मृती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
आयसीसी रॅकिंगचा टेबल पाहा
इंग्लंडच्या खेळाडूंनाही फायदा
तुम्हाला हे माहिती आहे का की, आयसीसी रॅकिंगमध्ये भारताच्या स्मृती मंधानानं आगेकूच केली असतील तरी इंग्लंडला देखील फायदा झाला आहे. इंग्लंडच्या एम्मा लांबा आणि सोफी एक्लस्टन यांना तीन स्थानांचा फायदा झाला आहे. दोघींनाही तीन-तीन स्थानांचा फायदा झाला. या दोघीही आता 64 आणि 72 व्या स्थानावर आल्या आहेत. चार्ली डीन 86 व्या स्थानावर पोहचली आहे.