Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : एका चेंडूचं ‘तीन अंकी नाटक’, आउट-नॉटआउट, डीआरएस मग नो बॉल तरीही मंयक अग्रवाल बाद | IND vs SL

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) सुरु होऊन काहीच मिनिटात मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO : एका चेंडूचं 'तीन अंकी नाटक', आउट-नॉटआउट, डीआरएस मग नो बॉल तरीही मंयक अग्रवाल बाद | IND vs SL
Mayank Agarwal Image Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 3:45 PM

मुंबई : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) सुरु होऊन काहीच मिनिटात मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय डावाचे दुसरे षटक सुरू होते. या षटकात खेळपट्टीच्या 22 यार्ड परिसरात असे काही घडले, ज्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडूंसह प्रेक्षक अचंबित झाले होते. अनेकदा अशा घटनांनी फलंदाज अस्वस्थ होतात. काही सेकंदांसाठी गोष्टी पंचाच्या आकलनापलीकडे जातात. भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात जोरदार अपील. आउट, नॉट आऊट, डीआरएस आणि नो बॉलचा त्रिकोणी गोंधळ (One ball Drama) मैदानात पाहायला मिळाला. हे संपूर्ण नाटक फक्त एका चेंडूभोवती घडत होतं. ज्याची टीम इंडियाला मोठी किंमत मोजावी लागली.

आता तुम्ही नेमकं काय घडलं ते जाणून घ्या. भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात विश्वा फर्नांडो गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथा चेंडू फलंदाज मयंक अग्रवालच्या पॅडला लागला. त्यानंतर श्रीलंकन संघाने जोरदार अपील केलं. हे प्रकरण इथेच थांबले असते तर बरे झाले असते. कारण, पंचांनी चेंडू नो बॉल म्हटल्यावर मयंक अग्रवालला नॉटआऊट घोषित करण्यात आले होते.

एक चेंडू आणि मोठा ड्रामा

चेंडू मयंकच्या पॅडवर आदळून काही अंतरावर गेल्यावर मयंक लेग बाय रनसाठी धावतो. पण, रोहित त्याला माघारी जाण्यास सांगतो, पण तोवर मयंक खूप पुढे आलेला होता. याच संधीचा फायदा घेत डिकवेलाने त्याला धावबाद केले. खर तर चेंडू क्षेत्ररक्षाच्या जवळ असूनही मयंक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. मयंकने अर्ध्याहून अधिक खेळपट्टी पार केली होती. पण, परिस्थिती समजून रोहितने आपलं पाऊल मागे घेतलं. डिकवेलाने मयंकला धावबाद करण्यापूर्वी डीआरएसची मागणी केली होती. चेंडू नो बॉल असला तरी मयंकला धावबाद होऊन पव्हेलियनकडे परतावे लागले.

भारताचं नुकसान

मयंक अग्रवाल बाद झाला तेव्हा त्याच्या खात्यात फक्त 4 धावा होत्या आणि भारताच्या धावफलकावर केवळ 10 धावा होत्या. दुसऱ्याच षटकात विकेट गमावल्याने टीम इंडिया दबावात होती. त्यानंतर 10 व्या षटकात रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला.

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.