Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार?

IND vs PAK : उभयसंघात गेल्या 15 वर्षांपासून मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही संघात अखेरची कसोटी मालिका ही 2007 मध्ये खेळवण्यात आली होती.

Ind vs Pak : टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 11:33 PM

मुंबई : टीम इंडिया-पाकिस्तान (IND vs PAK) म्हणजे चीर प्रतिद्वंदी. दोन्ही देशातील संबंधांमुळे सध्या तरी दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) स्पर्धेत खेळतात. दोन्ही संघांमध्ये 2007 नंतर द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र भारत-पाक टी 20 वर्ल्ड कपमधील सामन्याला मिळालेली लोकप्रियता पाहता मेलबर्न क्रिकेट क्लब भारत-पाक द्विपक्षीय मालिकेच्या यजमानपदासाठी इच्छूक आहे. एमसीजीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शासनाने भारत-पाक द्विपक्षीय मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी (Cricket Australia) चर्चा केली आहे. (mcc australia is intrested and also offers to host about ind vs pak test series)

एमसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी दोन्ही संघातील कसोटी मालिकेच्या आयोजनाबाबत उत्सुकता दाखवलीय.

एमसीजीत कसोटी मालिकेच्या आयोजनाची शक्यता

“निश्चितप्रमाणे एमसीजीत 3 सामन्यांचं शानदार आयोजन होईल. दरवेळेस स्टेडियम पूर्ण भरलेलं असेल. आम्ही याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मला माहित आहे की व्हीक्टोरिया सरकारनेही असंच केलं आहे. सध्या सर्व शेड्यूल बिजी आहे. अशा बिजी शेड्यूलमध्ये मालिकेचं आयोजन करणं किचकट आहे. त्यामुळे मालिकेचं आयोजन हे आव्हानात्मक आहे”, असं फॉक्स म्हणाले. ते एसईए रेडियोसोबत बोलत होते.

हे सुद्धा वाचा

“क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत आयसीसीशी बोलायला हवं. आशा आहे की ऑस्ट्रेलिया याबाबत आयसीसीशी चर्चा करत राहिल, याबाबत आग्रही असेल. जेव्हा जगातील अनेक स्टेडियम रिकामी पाहता तेव्हा मला असं वाटतं की खचाखच भरलेलं स्टेडियम आणि तिथिल वातावरण खेळासाठी पोषक असेल”, असा आशावादही फॉक्स यांनी व्यक्त केला.

दरम्यान उभयसंघात गेल्या 15 वर्षांपासून मालिका खेळवण्यात आलेली नाही. दोन्ही संघात अखेरची कसोटी मालिका ही 2007 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत दोन्ही संघ हे फक्त आयसीसी आणि आशिया स्पर्धेतच आमनेसामने येतात.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.