IPL 2021 | “वॉर्नरचा तळतळाट लागला”, आयपीएल स्थगितीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ
काही खेळाडूंना कोरोनाची (Corona) लागण झाली. त्यामुळे दररोज काही खेळाडू हे बाधित होत होते. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) आयपीएल स्पर्धा (IPL 2O21) स्थगित केली आहे. यावरुन सोशल मीडियावर (Social Media) भन्नाट मीम्स (Memes) पाहायला मिळत आहे.
मुंबई | देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना अन कोरोनाच आहे. त्यात काही दिवसांआधी आयपीएलमधील (IPL 2021) बायो बबलमध्येही (Bio Bubble) कोरोना जाऊन पोहचला. खेळाडूंना बाधा झाली. वाढता प्रसार आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्पर्धा स्थगित करण्यात आली. कोरोनामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नको असेलली पॉझिटिव्हीटी पसरलेली आहे. या अशा वातावरणात आयपीएलमुळे क्रिकेट चाहत्यांचा दररोज 5 तास मनोरंजन व्हायचं. मात्र आता स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. (Memes go viral on social media after IPL 2021 postponed due to corona)
स्पर्धा रद्द केल्याने एकाबाजूला क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला या निर्णयावर मीम्सच्या (Ipl Memes) माध्यमातून विनोद केला जात आहे. या मीम्सच्या माध्यमातून काही मीमर्स हे नाराजी व्यक्त करत आहेत. तर काहींनी मिम्सद्वारे या निर्णयाचं स्वागत केलंय. “वॉर्नरचा तळतळाट लागला”, असं एका युझरने म्हटलंय.
“डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला”
डेव्हिड वॉर्नरची (Dawid Warner) काही दिवसांपूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हकाळपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जागी केन विलियमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर वॉर्नरला पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली नाही. वॉर्नर थेट वॉटरबॉय झालेला दिसून आला. वॉर्नरला वगळल्यामुळे त्याचा तळतळाट लागला आणि आयपीएल स्थगित करण्यात आली, असं एका युझर्सचं म्हणनं आहे.
“आयपीएलचा आधार होता”
एकच आधार होता. बीसीसीआयने तो ही तुम्ही हिरावून घेतला, असं ट्विट हिमांशू त्रिपाठी या युजरने केलंय
Ek hi toh sahara tha woh bhi cheen liye tum @BCCI #iplsuspended #IPL pic.twitter.com/ncFoTOOj7i
— Himanshu Tripathi (@manas_here_) May 4, 2021
RCB ची फिरकी
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतर हंगामांच्या तुलनेत यावेळेस दमदार कामगिरी केली. तसेच रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्ल्सही चांगल्या फॉर्मात होती. मात्र अचानकपणे स्पर्धा थांबवण्यात आली. यामुळे बंगळुरु आणि दिल्लीची भावना व्यक्त करणारी एक मीम ट्विट करण्यात आली आहे.
महिलावर्गात आनंदाचं वातावरण
आयपीएलच्या सामन्यांना आणि मालिकांना संध्याकाळी 7 नंतर सुरुवात होते. मात्र आयपीएलमुळे क्रिकेट चाहत्यांच्या घरातील महिला वर्गाला सिरीयल्स पाहायला मिळत नव्हते. मात्र आता स्पर्धा रद्द झाली. त्यामुळे पुढे स्पर्धा सुरु होण्यापर्यंत रिमोटवर महिलांचंच राज्य असेल. यावरुनही एक मीम्स शेअर करण्यात आलं आहे.
My mom who's not able to watch her favorite serials just because of IPL… Happiest person right now ??#iplsuspended pic.twitter.com/DPJdAXneIQ
— Rîo Røhit 7?? (@RioRohit77) May 4, 2021
कोरोनाबाधित खेळाडू आणि महत्वाचे सदस्य
रिद्धीमान साहा, अमित मिश्रा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, लक्ष्मपती बालाजी आणि काशी विश्वनाथन (सीएसके सीईओ) यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या
BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत
IPL suspended : कोरोनाचा उद्रेक, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता विळख्यात, कोणत्या संघाच्या किती खेळाडूंना संसर्ग?
(Memes go viral on social media after IPL 2021 postponed due to corona)