MI Retention List IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून 5 खेळाडू रिटेन, रोहितला सोडलं की ठेवलं? सर्वाधिक रक्कम या खेळाडूला

Mumbai Indians Retention Player List for IPL 2025 in Marathi: क्रिकेट चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी कायम ठेवलं आहे. पाहा या 5 जणांमध्ये कुणाचा समावेश आहे.

MI Retention List IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून 5 खेळाडू रिटेन, रोहितला सोडलं की ठेवलं? सर्वाधिक रक्कम या खेळाडूला
Mumbai IndiansImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 6:09 PM

क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स टीममध्ये कुणाला रिटेन केलं जाणार? याची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. मुंबई इंडियन्सने 18 व्या हंगामासाठी एकूण 5 खेळाडूंना रिटेन अर्थात कायम ठेवलं आहे. हे पाचही खेळाडू हे पहिल्या फळीतले आहेत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचे हे पाचही कॅप्ड खेळाडू आहेत. कॅप्ड खेळाडू म्हणजे आपल्या देशाकडून न खेळलेला खेळाडू.

मुंबईचे 5 खेळाडू कोण?

पलटणने कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह, ‘मिस्टर 360’ सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. नियमांनुसार, एका टीमला 18 व्या मोसमासाठी 6 खेळाडूंनाच रिटेन करण्याची परवानगी होती. त्यानुसार जास्तीत जास्त 5 कॅप्ड तर 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी होती. मात्र मुंबईने 5 कॅप्टन आणि त्यातही कॅप्ड खेळाडूच कायम ठेवले आहेत. त्यामुळे मुंबई ऑक्शनमधून अनकॅप्ड खेळाडूची निवड करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जसप्रीत बुमराह सर्वात महागडा

मुंबईने या 5 खेळाडूंपैकी जसप्रीत बुमराह याला सर्वाधिक रक्कम दिली आहे. पलटणने जसप्रीत बुमराह याच्यासाठी सर्वाधिक 18 कोटी रुपये मोजले आहेत. तर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांना प्रत्येकी 16 कोटी 35 लाख रुपये मोजून संघात कायम ठेवलं आहे. रोहित शर्मा याच्यासाठी 16 कोटी 30 लाख रुपये मोजण्यात आले आहेत. तर तिलक वर्माला 8 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत.

मुंबईचे ‘5 स्टार’ खेळाडू

पहिली यशस्वी टीम

दरम्यान मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पहिली टीम आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ही कामगिरी केली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.