MI Players List 2023: IPL च्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे. या टीममध्ये मॅच विनर्स मोठ्या संख्येने आहेत. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. हा संघ तळाला राहिला. पुढच्या 2023 च्या सीजनचा विचार करुन मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये काही बदल केले आहेत. मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंना रिटेन केलय. काही प्लेयर्सना रिलीज केलय.
IPL 2023 साठी मैदानात उतरण्याआधी मुंबई इंडियन्सने काही खेळाडूंना रिलीज केलय. म्हणजे आता काही खेळाडू मुंबई इंडियन्सची साथ सोडणार आहेत.
रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची फायनल लिस्ट बीसीसीआयला सोपवण्याआधी मुंबई इंडियन्सने आणखी एक मोठं पाऊल उचललय. आपली गोलंदाजी भक्कम करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला ट्रेड केलय.
Once a part of #OneFamily, always a part of #OneFamily ?#MumbaiIndians pic.twitter.com/4eTXunUyof
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
MI ने कुठल्या खेळाडूंना रिटेन केलं?
रोहित शर्मा, टिम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, आकाश मधवाल.
Locked & loaded for #IPL2023 ??
Presenting our stars for the upcoming season ⭐?#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/lyg8IOFwpT
— Mumbai Indians (@mipaltan) November 15, 2022
MI कुठल्या खेळाडूंना रिलीज केलं?
फॅबियन एलन, कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयांक मार्केडे, ऋतिक शौकीन, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बासिल थम्पी, डॅनियल सॅम्स, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, राहुल बुधी, रिली मेरेडीथ, संजय यादव,
मिनी ऑक्शन कुठे होणार?
मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स ऑलराऊंडर खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंवर बोली लावण्याची शक्यता आहे. IPL 2023 चं मिनी ऑक्शन 23 डिसेंबरला कोच्चीला होणार आहे. मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने 14 सामने खेळले. त्यात 4 मॅच जिंकल्या, 10 सामने गमावले.