मुंबई | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 12 वा सामना हा 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. मुंबई या मोसमात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानात खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना आयपीएल फायनलपेक्षा प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. मात्र या दरम्यान मुंबईच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध्या सामन्यातून बाहेर पडावं लागू शकतं.
मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह हा आधीच या मोसमातून बाहेर पडला आहे. त्यामुळे बॉलिंगची पूर्णपणे जबाबदारी ही जोफ्रा आर्चर याच्याकडे आहे. मात्र चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी जोफ्रा आर्चर याला दुखापत झाली आहे. एस बद्रीनाथ याने आपल्या युट्यूब चॅनेलवर याबाबतची मागहिती दिली आहे. जोफ्राला सरावादरम्यान कोपऱ्याला बॉल लागला आहे. ज्यामुळे जोफ्राला सामन्यातून बाहेर पडावं लागू शकतं.
जोफ्राने आतापर्यंत आयपीएलमध्ये 36 सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एकूण टी 20 कारकीर्दीत 128 डावात 167 विकेट्स घेतल्या आहेत. जोफ्राची 18 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
दरम्यान मुंबईचा हा या मोसमातला दुसरा सामना आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे आता मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता ‘पलटण’ चेन्नई विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असेल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.
टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.