MI vs CSK Live Streaming | कधी आणि कुठे पाहता येणार सामना, जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Apr 08, 2023 | 10:45 AM

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघातील अटीतटीचा सामना कुठे कधी आणि केव्हा पाहता येणार, याबाबत जाणून घ्या सविस्तर.

MI vs CSK Live Streaming | कधी आणि कुठे पाहता येणार सामना, जाणून घ्या एका क्लिकवर
Follow us on

मुंबई | आयपीएलच्या 16 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना आज (8 एप्रिल) 2 सामन्यांची मेजवाणी मिळणार आहे. मात्र चाहत्यांना पहिल्यापेक्षा दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे, त्याचं कारणही तसंच आहे. दुसरा सामना हा स्पर्धेच्या इतिहासातील दोन यशस्वी संघ आमनेसामने असणार आहे. ही रायव्हलरी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याला ‘एल क्लासिको’ असं म्हणतात. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व नेहमीप्रमाणे रोहित शर्मा करणार आहे. तर चेन्नईची कॅप्टन्सी महेंद्रसिंह धोनीकडे आहे. या मॅचमध्ये ब्लू आर्मी बाजी मारणार की धोनीचे धुरंधर भाव खाणार याकडे लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी आणि कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना हा आज 8 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचं आयोजन कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. तसेच सामन्यातील प्रत्येक क्षणाची माहिती टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवरही मिळेल.

लाईव्ह प्रसारण कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर करण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.