MI vs DC Score, आयपीएल 2024 Highlight : मुंबई इंडियन्सची विजयाची गुढी, दिल्लीवर 29 धावांनी विजय
Mumbai Indians vs Delhi Capitals IPL Cricket Score and Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमातील सुरुवात अत्यंत वाईट झाली. मुंबईला सलग 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर अखेर दिल्लीला लोळवत मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज 7 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूण 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबईने या हंगामात दिल्लीवर मात करत पहिला विजय साकारला आहे. हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत मुंबईने दिल्लीला 29 धावांनी पराभूत केलं. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईची दिल्लीवर 29 धावांनी मात
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 29 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या.
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्लीला तिसरा धक्का, ऋषभ पंत आऊट
मुंबईने इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला तिसरा झटका दिला आहे. गेराल्ड कोएत्झी याने पंतला कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती 1 धावेवर कॅच आऊट केलं.
-
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्ली दुसरा धक्का, पृथ्वी आऊट
जसप्रीत बुमराहने याने पृथ्वी शॉ याला आऊट करत दुसरा झटका दिला आहे. बुमराहने पृथ्वीला कडक यॉर्कवर बोल्ड केलं. पृथ्वीने 40 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईकर पृथ्वीचं दिल्लीसाठी अर्धशतक
लोकल बॉय दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्ससाठी खणखणीत अर्धशतक ठोकलंय. दिल्लीने 9 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 84 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ 57 आणि अभिषे पोरेल 17 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्लीला पहिला धक्का, डेव्हीड वॉर्नर आऊट
मुंबईने दिल्लीला पहिला धक्का दिला आहे. रोमरियो शेफर्ड याने डेव्हिड वॉर्नरला कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. वॉर्नरने 10 धावा केल्या.
-
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजायासाठी 235 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून मुंबईकर पृथ्वी शॉ आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हीड वॉर्नर या दोघांनी ओपनिंग केली आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्ली 235 धावांचं आव्हान
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. मुंबई कडून रोहित शर्मा, टीम डेव्हिड, ईशान किशन, कॅप्टन हार्दिक पंड्या आणि रोमरियो शेफर्ड या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. या पाच जणांनी अनुक्रमे 49, 45*, 42, 39 आणि 39* अशा धावा केल्या.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईला पाचवा झटका, कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या 39 धावा करुन आऊट झाला आहे. मुंबईची धावसंख्या 5 बाद 182 अशी झाली आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : हार्दिक-डेव्हीडची झंझावाती खेळी
मुंबईने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले. मात्र त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हीड या दोघांनी मुंबईचा डाव सावरला आहे. मुंबईच्या 17 ओव्हरपर्यंत 4 बाद 167 धावा केल्या आहेत.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईची घसरगुंडी, तिलक वर्मा आऊट, पलटणला चौथा धक्का
मुंबईची अफलातून सुरुवातीनंतर घरसगुंडी झाली आहे. मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशननंतर आता तिलक वर्मा आऊट झाला आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : ईशान किशन आऊट, मुंबईला तिसरा झटका
दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईला तिसरा झटका दिला आहे. अक्षर पटेल याने आपल्या बॉलिंगवर ईशान किशन याला आऊट करत आपली दुसरी विकेट घेतली. तर मुंबईला तिसरा झटका दिला. ईशानने 42 धावांची खेळी केली.
-
MI vs DC IPL 2024 Updates : सूर्यकुमार यादव आऊट
रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर मुंबईचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव मैदानात आला. दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या सूर्याकडून मुंबईच्या चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होता. मात्र सूर्याला भोपळाही फोडता आला नाही. सूर्या झिरोवर आूट झाला.
-
MI vs DC IPL 2024 Updates : रोहित शर्मा आऊट
मुंबईला चांगल्या सुरुवातीनंतर मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा 49 धावांवर आऊट झाला आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईचा पावरप्लेमध्ये धुमधडाका
मुंबई इंडियन्सच्या सलामी जोडीने पावरप्लेमध्ये धमाका केला आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 75 धावा केल्या आहेत.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबई इंडियन्सची अप्रतिम सुरुवात
रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने मुंबईला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. या सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 46 धावा जोडल्या आहेत.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-ईशान ओपनिंग जोडी मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
-
MI vs DC IPL 2024 Updates : दिल्लीचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 आणि दिल्ली कॅपिट्ल्सने 2 बदल केले आहेत.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबई-दिल्ली यांच्यात वरचढ कोण?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात एकूण 33 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने यात 18 सामन्यात बाजी मारली आहे. तर दिल्लीने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचं गेल्या पाच सामन्यांमध्ये वरचड आहे. दिल्लीने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. वानखेडेवर मुंबई विरुद्ध दिल्ली दोन्ही संघ 8 वेळा भिडले आहेत.मुंबईने 5 तर दिल्लीने 3 सामन्यात विजय मिळवला आहे.
-
MI vs DC IPL 2024 Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
Published On - Apr 07,2024 2:13 PM