MI vs KKR IPL 2022 Match Head to Head: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा हंगाम आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

MI vs KKR IPL 2022 Match Head to Head: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:43 PM

मुंबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा हंगाम आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईबद्दल असं म्हटलं जातं की हा संघ धिमी सुरुवात करतो आणि नंतर वेग पकडतो. मुंबईचा असा खेळ यापूर्वी आपण अनेकदा पाहिला आहे. असे अनेक मोसम आले ज्यात मुंबईच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यानंतर या संघाने पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. या हंगामातही संघाच्या चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मोसमातील तिसऱ्या सामन्यात या संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होत आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबईसाठी वाईट गेला असला तरी कोलकात्याने यंदाच्या मोसमाची दिमाखात सुरुवात केली आहे. कोलकात्याने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून या तीन सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्ध कोलकाता आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. मात्र उभय संघांमधील आकडेवारी पाहिली तर कोणीही म्हणेल की मुंबईला हरवणं कोलकात्यासाठी खूप अवघड आहे.

हेड डू हेड मध्ये मुंबईचं पारडं जड

या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईचे पारडे जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 22 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर केवळ सात सामने कोलकात्याच्या खात्यात गेले आहेत. हे आकडे मुंबईला आत्मविश्वास देण्यासाठी आणि कोलकात्याला घाबरवण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र, सध्याचा फॉर्म पाहता कोलकात्याचा संघ मजबूत दिसत आहे.

मागील 5 सामन्यांमधील उभय संघांची कामगिरी

या दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांचे निकाल पाहिले तरी मुंबईचाच वरचष्मा पाहायला मिळाला आहे. कोलकात्याने गेल्या पाचपैकी केवळ एकच विजय मिळवला आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने विजय मिळवला होता. अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकात्याने सात विकेट्सने विजय मिळवला. तर त्याआधीच्या चार सामन्यांत मुंबईने बाजी मारली होती.

इतर बातम्या

Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO

IPL 2022 points table : राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.