मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. मुंबईचा हा या मोसमातील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तसेच मुंबईची कोलकातावर आतापर्यंत विजय मिळवण्याची ही 33 सामन्यांपैकी 23 वी वेळ ठरली. तसेच मुंबई इंडियन्सचा हा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवरील पहिला विजय ठरला.
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्सने पराभूत करत मोसमातील सलग दुसरा विजय साजरा केला आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी केलेल्या तडाखेदार खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजाने मुंबईची सेट झालेली सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा ही जोडी फोडली आहे. सुयशने टिळक वर्मा याला बोल्ड केलं. सुयशने 25 बॉलमध्ये 30 धावा केल्या.
वादळी अर्धशतक ठोकल्यानंतर इशान किशन आऊट झाला आहे. इशानने सुरुवातीपासून तुफानी बॅटिंग केली. इशानने 25 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्सने आक्रमक सुरुवात केली. इशान किशन आणि इमपॅक्ट प्लेअर रोहित शर्मा या जोडीने 65 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मुंबईला पहिला झटका लागला. सुयश शर्मा या युवा गोलंदाजाने आपल्या बॉलिंगवर रोहित शर्मा याला आऊट केलं. उमेश यादव याने डाईव्ह घेत अप्रतिम कॅच घेतला.
रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीसाठी टॉप गिअर टाकत पावर प्लेच्या ओव्हरमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 186 धावांचं आव्हान मिळालं आहे. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा हा बॅटिंगसाठी आला आहे. तर त्याच्यासोबत इशान किशन आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 185 धावा केल्या. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने 104 धावांची शतकी खेळी केली. वेंकटेशशिवाय इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केकेआरकडून रहमुल्लाह गुरबाज याने 8, कॅप्टन नितीश राणा याने 5, शार्दुल ठाकूर 13, रिंकू सिंह 18, आंद्रे रसेल 21* आणि सुनील नारायण याने 2* धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्सकडून हृतिक शौकीन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन, दुआन जान्सेन, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
वेंकटेश अय्यरचं याचं खणखणीत शतक
Innings Break!
A mighty TON from @venkateshiyer powers @KKRiders to 185/6 ? ?
Hrithik Shokeen scalps 2⃣ wickets ? ?
The @mipaltan chase to begin shortly! ? ?
Who will win the 2 points today ?
Scorecard ▶️ https://t.co/CcXVDhfzmi #TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/LxO2ejBjYf
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2023
शानदार शतक ठोकल्यानंत वेंकटेश अय्यर आऊट झाला आहे. वेंकटेशने 51 बॉलमध्ये 104 धावांची शतकी खेळी केली.
कोलकाताने चौथी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूर याला हृतिक शौकीन याने 13 धावांवर टिळक वर्माच्या हाती कॅच आऊट केलं.
कोलकाता 12 ओव्हरनंतर मजबूत स्थितीत पोहचली आहे. वेंकटेश अय्यर याच्या फटकेबाजीमुेळ मुंबई इंडियन्स बॅकफुटवर गेली आहे. शार्दुल ठाकूर आणि वेंकटेश अय्यर जोडी मैदानात खेळत आहे.
ऋतिक शौकीन याने कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा झटका दिला आहे. ऋतिकने केकेआर कॅप्टन नितीश राणा याला आऊट केलं आहे. नितीशने 5 धावा केल्या.
कोलकाताला दुसरा झटका लागला आहे. मुंबई इंडियन्सच्या अनुभवी फिरकीपटू पियूष चावला याने गुगली बॉलवर रहमानुल्लाह गुरुबाज याला दुआन जान्सेन याच्या हाती कॅचआऊट केलं.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिली विकेट गमावली आहे. एन जगदीशन आऊट झाला आहे.
मुंबईकडून पदार्पणपणीवर अर्जुन तेंडुलकर हा पहिली ओव्हर टाकत आहे. केकेआरकडून रहमानुल्लाह गुरुबाज आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून रहमानुल्लाह गुरुबाज आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता केकेआर मुंबईला घरच्या मैदानात विजयासाठी किती आव्हान देतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएलच्या 16 व्या मोसमात आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ एकूण 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय. तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष असणार आहे.