Arjun Tendulkar | मुंबई इंडियन्सकडून अखेर अर्जुन तेंडुलकर याचं पदार्पण
क्रिकेट चाहत्यांना आणि साऱ्या क्रिकेट विश्वाला ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर 2 वर्षांनी आला आहे. अर्जुन तेंडुलकर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करत आहेत.
मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 16 व्या मोसमातील 22 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. क्रिकेट चाहत्यांना गेल्या 2 वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं अखेर 2 वर्षांनंतर मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण झालं आहे.
आकडेवारी कुणाच्या बाजूने?
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यां हे दोन्ही संघ एकूण 32 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईने केकेआरला तब्बल 22 वेळा पराभूत केलंय. तर कोलकाताने मुंबईवर 9 वेळा विजय मिळवला आहे. मात्र गेल्या 3 सामन्यांमध्ये केकेआर मुंबईवर वरचढ राहिली आहे. केकेआरने मुंबईवर गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात आता काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अर्जुन तेंडुलकर याचं आयपीएल पदार्पण
????? ?????????. Mumbai Indians. Debut game. ?
THIS IS HAPPENING! ?#OneFamily #ESADay #MIvKKR #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ril_foundation pic.twitter.com/TsQxAxxyHb
— Mumbai Indians (@mipaltan) April 16, 2023
सूर्यकुमार यादव कॅप्टन
दरम्यान कोलकाता विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याला केकेआर विरुद्धच्या सामन्याआधी दुखापत झाली. त्यामुळे रोहित या सामन्यातून बाहेर झाला आहे. यामुळे सूर्याला कॅप्टन्सीची जबाबदारी दिली आहे. सूर्यकुमारची आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करण्याची ही पहिली वेळ आहे. आता सूर्या आपल्या नेतृत्वात मुंबईला होम ग्राउंड वानखेडेत या मोसमातील पहिला विजय मिळवून देणार का, हे टीम मॅनेजमेंट पाहणार आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.