MI vs KKR Live Score, IPL 2021 : थरारक सामन्यात मुंबईची कोलकात्यावर 10 धावांनी मात
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघांमध्ये चेन्नईतल्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सन कोलकात्यावर 10 धावांनी मात केली आहे. मुंबईने कोलकात्याला 153 धावांचे आव्हान दिले होते. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत हा सामना कोलकात्याच्या हातून हिरावला आहे. मुंबईकडून या सामन्यात राहुल चाहरने चार षटकात 27 धावा देत 4 बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने 4 षटकात 27 धावा देत 2 बळी घेत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका निभावली. कोलकात्याकडून या सामन्यात सलामीवीर नितीश राणाने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर शुभमन गिलने 33 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. (live scorecard)
LIVE NEWS & UPDATES
-
कोलकात्याचा 7 वा फलंदाज माघारी, मुंबईची सामन्यावर पकड
शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडवूर ट्रेंट बोल्टने पॅट कमिन्सला त्रिफळाचित करत कोलकात्याचा सातवा फलंदाज बाद केला.
-
मुंबईला सहावं यश, आंद्रे रसेल 9 धावांवर बाद
शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने आंद्रे रसेलला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोलकात्याला विजयासाठी तीन चेंडूत 14 धावांची आवश्यकता. (कोलकाता 140/6)
-
-
19 व्या षटकात बुमराहचं पुनरागमन
19 व्या निर्णायक षटकात जसप्रीत बुमराहने केवळ चार धावा देत सामन्यातील मुंबईचं आव्हान अद्याप जिवंत ठेवलंय. आता अखेरच्या षटकात कोलकात्याला 15 धावांची आवश्यकता आहे. (कोलकाता 138/5)
-
जसप्रीत बुमराह प्रभावहीन
मुंबईचा प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यात प्रभावी ठरलेला नाही. 17 व्या षटकात त्याने एका नो बॉलसह 8 धावा दिल्या. 3 षटकात त्याने 24 धावा दिल्या आहेत. अद्याप त्याला एकही विकेट मिळवता आलेली नाही.
-
कोलकात्याचा पाचवा गडी माघारी, शाकिब अल हसन 9 धावांवर बाद
कोलकात्याचा पाचवा गडी माघारी परतला आहे. फिरकीपटू कृणाल पंड्याने शाकिब अल हसनला सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केलं आहे.
-
-
मुंबईला चौथं यश, नितीश राणा 57 धावांवर बाद
मुंबईचा फिरकीपटू गोलंदाज राहुल चाहरने चौथं यश मिळवलं आहे. राहुलने सलामीवीर नितीश राणाला 54 धावांवर यष्टिचित करत सामन्यातील मुंबईचं आव्हान जिवंत ठेवलं आहे. (कोलकाता 122/4)
-
कोलकात्याला तिसरा झटका, कर्णधार मॉर्गन 7 धावांवर बाद
कोलकात्याच्या संघाला तिसरा झटका बसला आहे. कर्णधार मॉर्गन अवघ्या 7 धावा करन बाद. राहुल चाहरला तिसरं यश (कोलकाता – 104/3)
-
नितीश राणाचं सलग दुसरं अर्धशतक, कोलकात्याची विजयाच्या दिशेने वाटचाल
सलामीवीर नितीश राणाने सलग दुसरं अर्धशतक झळककावत कोलकाताला सुस्थितीत नेऊन ठेवलं आहे.
-
मुंबईला दुसरं यश, राहुल त्रिपाठी 5 धावांवर बाद
मुंबईला दुसरं यश मिळालं आहे. राहुल चाहरने राहुल त्रिपाठीला 5 धावांवर बाद केलं. (कोलकाता 84/2)
-
मुंबईच्या गोलंदाजांना पहिलं यश, शुभमन गिल 33 धावांवर बाद
मुंबईच्या गोलंदाजांना पहिलं यश मिळालं आहे. राहुल चाहरने सलामीवीर शुभमन गिलला कायरन पोलार्डकरवी झेलबाद केलं. गिलने 24 चेंडूत 33 धावांची खेळी केली. (कोलकाता 72/1)
-
नितीश राणाचा शानदार षटकार
सामन्यातील आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कायरन पोलार्डच्या गोलंदाजीवर नितीश राणाने शानदार षटकार लगावला. तर पुढच्याच चेंडूवर चौकार लगावत आक्रमक फटकेबाजी सुरु केली आहे.
-
पॉवर प्लेमध्ये कोलकात्याच्या 45 धावा, राणा-गिलची फटकेबाजी
पहिल्या पॉवर प्लेमध्ये कोलकात्याचे सलामीवीर नितीश राणा आणि शुभमन गिल या दोघांनी फटकेबाजी करत धावफलकावर 45 धावा लावल्या आहेत.
-
शुभमन गिलची फटकेबाजी, मार्को यान्सिनच्या षटकात तीन चौकार
सामन्यातील सहाव्या षटकात, मार्को यान्सिनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने तीन चौकार लगावत आक्रमक स्टान्स घेतला आहे.
-
कोलकात्याच्या दोन षटकात आठ धावा, तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राणाचा सिक्स
कोलकात्याच्या दोन षटकात आठ धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नितीश राणाने षटकार मारला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला.
-
कोलकाताच्या डावाला सुरुवात, नितीश राणा आणि गिल मैदानावर
कोलकाताच्या डावाला सुरुवात, राणा आणि गिल मैदानावर, नितीश राणाने चौकार मारुन डावाला सुरवात केली. पहिल्या षटकात कोलत्याला चारच केल्या.
-
मुंबईचा 9 वा गडी माघारी, जसप्रीत बुमराह शून्यावर बाद
आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर शाकीब अल हसनकडे झेल देत जसप्रीत बुमराह बाद.
-
मुंबईचा आठवा गडी बाद, कृणाल पंड्या 15 धावा करुन पव्हेलियनकडे रवाना
मुंबईचा आठवा गडी बाद, कृणाल पंड्या 15 धावा करुन पव्हेलियनकडे रवाना
-
कृणाल पंड्याचे सलग दोन चौकार
शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर कृणाल पंड्याचे सलग दोन चौकार
-
मुंबईची सातवी विकेट, मार्को यान्सिन शून्यावर बाद
मुंबईने सातवी विकेट गमावली आहे. मार्को यान्सिन शून्यावर बाद झाला आहे. आंद्रे रसेलने मार्कोला पॅट कमिन्सकरवी झेलबाद केलं. (मुंबई 126/7)
-
कोलकात्याच्या गोलंदाजांना सहावं यश, कायरन पोलार्ड 5 धावांवर बाद
कोलकात्याच्या गोलंदाजांना सहावं यश मिळालं आहे. आंद्रे रसेलने कायरन पोलार्डला विकेटकीपर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं आहे. (मुंबई 125/6)
-
कोलकात्याच्या गोलंदाजांना पाचवं यश, हार्दिक पंड्या 15 धावांवर बाद
कोलकात्याच्या गोलंदाजांना पाचवं यश मिळालं आहे. प्रसिद्ध कृष्णाने हार्दिक पंड्याला आंद्रे रसेलकडे झेल द्यायला भाग पाडलं. (मुंबई 123/5)
-
मुंबईला चौथा झटका, रोहित शर्मा 43 धावांवर बाद
मुंबईने महत्त्वाची विकेट गमावली. 15 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पॅट कमिन्सने रोहित शर्माला (43) त्रिफळाचित केलं. (मुंबई 115/4)
-
रोहित शर्माचा शानदार षटकार
प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने षटकार ठोकत आक्रमक स्टान्स घेतला आहे.
-
मुंबईला तिसरा झटका, इशान किशन 1 धाव करुन बाद
पॅट कमिन्सने इशान किशनला (1) सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद केलं. (मुंबई – 88/3)
-
कोलकात्याला दुसरं यश, आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव 56 धावांवर बाद
कोलकाता नाईट रायडर्सला दुसरं यश मिळालं आहे. आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव 56 धावांवर बाद झाला. शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने चांगला झेट टिपला.
-
सूर्यकुमार यादवचं शानदार अर्धशतक
पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार ठोकत सूर्यकुमार यादवने अर्धशतक (33 चेंडूत) पूर्ण केलं. (मुंबई 81/1)
-
सूर्यकुमारचा हल्लाबोल
पॅट कमिन्सच्या दुसऱ्या षटकात (सामन्यातील 8 वं षटक) तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने शानदार चौकार लगावले, तर चौथ्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला. (मुंबई 64/1)
-
पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईच्या 1 बाद 42 धावा, रोहित-सूर्यकुमारची सावध सुरुवात
पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबईने एका विकेटच्या बदल्यात 42 धावा जमवल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने सावध सुरुवात केली आहे.
-
रोहित शर्माचा चौकार
वरुण चक्रवर्तीच्या दुसऱ्या षटकातील ( सामन्यातील पाचव्या षटकात) शेवटच्या चेंडवूर रोहित शर्माचा चौकार (मुंबई – 37/1)
-
सूर्यकुमार यादवचा हरभजनच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
सूर्यकुमार यादवने हरभजन सिंहच्या दुसऱ्या षटकात तीन चौकार लगावत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
-
मुंबईला पहिला झटका, सलामीवीर क्विंटन डीकॉक 2 धावांवर बाद
मुंबईने पहिली विकेट गमावली आहे. वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर (सामन्यातील दुसरं षटक) राहुल त्रिपाठीने एक सोपा झेल टीपत क्विंटन डीकॉकला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
-
रोहितचा पहिला चौकार
सामन्यातील दुसऱ्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सलामीवीर रोहित शर्माने पहिला चौकार लगावला.
-
KKR vs MI, आजच्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, मार्को यान्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
कोलकाता नाइट रायडर्स
शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, ऑयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, हरभजन सिंह, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.
-
नाणेफेक जिंकून कोलकात्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
कोलकात्याचा कर्णधार इयॉन मोर्गनने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Match 5. Kolkata Knight Riders win the toss and elect to field https://t.co/blOfaL84mJ #KKRvMI #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2021
-
मुंबईचंच पारडं जड
आयीपएल 2021 स्पर्धेत मुंबईचा संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला असला तरी कोलकात्याविरुद्ध मुंबईचंच पारडं जड आहे. कारण आयपीएल इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी 21 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर 6 सामन्यांमध्ये कोलकात्याला विजय मिळवता आला आहे.
Hello and welcome to Match 5 of the #VIVOIPL
The Eoin Morgan-led #KKR will square off against #MumbaiIndians led by Rohit Sharma.
Which team are you rooting for?#KKRvMI pic.twitter.com/iLYv4dD9BU
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2021
Published On - Apr 13,2021 11:16 PM