MI vs KKR Score And Updates IPL 2025 : मुंबईचा धमाकेदार विजय, केकेआरचा 8 विकेट्सने धुव्वा
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Score And Highlights In Marathi: मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सलग 2 सामने गमावल्यानंतर अखेर घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. मुंबईने केकेआरवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने सलग दोन सामने गमावल्यानंतर कमबॅक केलं आणि केकेआरचा घरच्या मैदानात 8 विकेट्सने धुव्वा उडवला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय केला. मुंबईकडून पदार्पणवीर अश्वनी कुमार याने 3 ओव्हरमध्ये 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच इतर गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. त्यामुळे मुंबईने केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर गुंडाळलं. त्यानंतर मुंबईने हे 117 धावांचं आव्हान 12.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. रायन रिकेल्टन याने 41 बॉलमध्ये नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 9 चेंडूत 27 धावा केल्या.
LIVE NEWS & UPDATES
-
MI vs KKR Live Update : मुंबईचा धमाकेदार विजय, केकेआरचा 8 विकेट्सने धुव्वा
मुंबईने आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयाचं खातं उघडलं आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 12.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून सहजप पूर्ण केलं. मुंबईने अशापक्रारे 8 विकेट्सने हा सामना जिंकला.
-
MI vs KKR Live Update : मुंबईला दुसरा झटका, विल जॅक्स आऊट
मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. विल जॅक्स 16 धावा करुन आऊट झाला आहे.
-
-
MI vs KKR Live Update : रोहित शर्मा आऊट, मुंबईला पहिला झटका
रोहित शर्माने सलग तिसऱ्या सामन्यात निराशा केली आहे. रोहित शर्मा 13 धावा करुन आऊट झाला आहे. आंद्रे रसेल याने मुंबईला पहिला झटका दिला आहे.
-
MI vs KKR Live Update : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रिकेल्टन मैदानात
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा -रायन रिकेल्टन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. केकेआरने मुंबईसमोर 117 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
MI vs KKR Live Update : केकेआरचं 116 रन्सवर पॅकअप, मुंबईची कडक बॉलिंग
मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार बॉलिंगच्या जोरावर केकेआरचं पॅकअप केलं आहे. मुंबईने केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 रन्सवर ऑलआऊट केलं आहे. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 117 धावा करायच्या आहेत.
-
-
MI vs KKR Live Update : हर्षित राणा आऊट, केकेआरला नववा झटका
विघ्नेश पुथुर याने हर्षित राणा याला 4 रन्सवर नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. केकेआरने यासह नववी विकेट गमावली आहे.
-
MI vs KKR Live Update : आंद्रे रसेल बोल्ड, केकेआरला आठवा झटका
डेब्यूटंट अश्विनी कुमार याने आंद्रे रसेल याला क्लिन बोल्ड केलं आहे. अश्विनीने रसेलला 5रन्सवर बोल्ड केलं.
-
MI vs KKR Live Update : केकेआरला सातवा झटका, मनीष पांडे आऊट
मुंबईने केकेआरला सातवा झटका दिला आहे. डेब्यूटंट अश्विनी कुमार याने मनीष पांडे (इमपॅक्ट) याला 19 रन्सवर बोल्ड केलं आहे.
-
MI vs KKR Live Update : केकेआरला सहावा झटका, रिंकू सिंह आऊट
मुंबई इंडियन्स केकेआरला सहावा झटका दिला आहे. अश्विनी कुमार याने रिंकूला नमन धीर याच्या हाती 17 रन्सवर आऊट केलं आहे.
-
MI vs KKR Live Update : केकेआरचा अर्धा संघ माघारी, अंगकृष रघुवंशी आऊट, पलटणची सामन्यावर पकड
केकेआरने पाचवी विकेट गमावली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने अंगकृष रघुवंशी याला 26 रन्सवर नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
-
MI vs KKR Live Update : वेंकटेश अय्यर आऊट, केकेआरला पावर प्लेमध्ये चौथा झटका
मुंबईने केकेआरला पावर प्लेमध्ये चौथा झटका दिला आहे. उपकर्णधार वेंकटेश अय्यर 3 रन्स करुन आऊट झाला आहे.
-
MI vs KKR Live Update : कर्णधार अजिंक्य रहाने आऊट
मुंबईने केकेआरला तिसरा झटका दिला आहे. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे 7 बॉलमध्ये 11 रन्स करुन आऊट झाला. अश्विनी कुमार याची ही पहिली विकेट ठरली. अश्विनीने मुंबईसाठी आयपीएल पदार्पण केलं आहे.
-
MI vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक कॅच आऊट, केकेआरला दुसरा धक्का
दीपक चाहर याने क्विंटन डी कॉक याला अश्वनी कुमार याच्या हाती 1 धावेवर कॅच आऊट केलं. केकेआरने अशाप्रकारे दुसरी विकेट गमावली आहे.
-
MI vs KKR Live Update : सुनील नारायण क्लिन बोल्ड, केकेआरला पहिला झटका, मुंबईची कडक सुरुवात
ट्रेन्ट बोल्ट याने मुंबईला कडक सुरुवात करुन दिली आहे. बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये केकेआरला पहिला झटका दिला आहे. सुनील नारायण याला भोपळाही फोडता आाल नाही.
-
MI vs KKR Live Update : सामन्याला सुरुवात, क्विंटन डी कॉक-सुनील नारायण जोडी मैदानात
मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. केकेआरकडून क्विंटन डी कॉक-सुनील नारायण जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs KKR Live Update : मुंबई आणि केकेआरची प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
-
MI vs KKR Live Update : मुंबईने टॉस जिंकला, केकेआरविरुद्ध निर्णय काय?
मुंबईने टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने केकेआरविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
MI vs KKR Live Update : कोलकाता नाईट रायडर्स टीम
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
-
MI vs KKR Live Update : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
-
MI vs KKR Live Update : मुंबई विरुद्ध केकेआर आमनेसामने
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 वा सामना मुंबई विरुद्ध केकेआर आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. दोन्ही संघांचा हा एकूण तिसरा सामना आहे. केकेआरने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर मुंबईने दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर या सामन्यात विजयी होण्याचं आव्हान आहे.
Published On - Mar 31,2025 5:59 PM





