मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईला धावांनी पराभूत केलं. लखनऊने 20 षटकात 3 गमवून 177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमवून 171 धावा करू शकला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्सचं प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. लखनऊला एका अंकांचा प्लेऑफमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे
लखनऊ सुपर जायंट्सने विजसाठी दिलेले 178 धावांचं आव्हान मुंबईला गाठता आलं नाही. रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. मात्र संघाला सेफ झोनमध्ये आणण्यास दोघांना अपयश आलं. रवि बिश्नोईच्या षटकावर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. त्याने 25 चेंडूत 37 धावा केल्या. इशान किशनने 39 चेंडूत 59 धावा करत बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवही काही खास करू शकला नाही. 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. नेहल वढेराची बॅट काही हवी तशी चालली नाही 20 चेंडूत 16 धावा करून तंबूत परतला. टीम डेविडने विजयाच्या पाठलाग करताना चांगली खेळी केली. मात्र विजयी लक्ष्य काही गाठता आलं नाही. शेवटच्या षटकात 11 धावा करता आल्या नाहीत.
Match 63. WICKET! 16.1: Nehal Wadera 16(20) ct Krishnappa Gowtham (Sub) b Mohsin Khan, Mumbai Indians 131/4 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. WICKET! 14.1: Suryakumar Yadav 7(9) b Yash Thakur, Mumbai Indians 115/3 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
5️⃣0️⃣ for @ishankishan51 but @bishnoi0056 gets him to pick his second wicket!#MI 104/2 after 11.2 overs
Follow the match ▶️ https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/Fh4Zw10HHL
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. WICKET! 9.4: Rohit Sharma 37(25) ct Deepak Hooda b Ravi Bishnoi, Mumbai Indians 90/1 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. 4.3: Naveen-ul-Haq to Rohit Sharma 6 runs, Mumbai Indians 45/0 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
आयपीएल 2023 स्पर्धेतील महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर सलग दोन धक्के लखनऊला बसले. दीपक हुड्डा आणि प्रेरक मांकड या दोघांना तंबूत पाठवलं. त्यानंतर क्विंटन डिकॉकही काही खास करु शकला नाही. 16 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार कृणाल पांड्या आणि मार्कस स्टोइनिसने डाव सावरला. दोघांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर दुखापत झाल्याने कृणाल पांड्या रिटायर्ट हर्ट झाला. त्याऐवजी निकोलस पूरन मैदानात उतरला.
मार्कस स्टोईनिसने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. 47 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी केली. तर कृणाला पांड्या 49 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.
Match 63. 17.1: Chris Jordan to Marcus Stoinis 6 runs, Lucknow Super Giants 129/3 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. WICKET! 6.1: Quinton De Kock 16(15) ct Ishan Kishan b Piyush Chawla, Lucknow Super Giants 35/3 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. WICKET! 2.2: Prerak Mankad 0(1) ct Ishan Kishan b Jason Behrendorff, Lucknow Super Giants 12/2 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
Match 63. WICKET! 2.1: Deepak Hooda 5(7) ct Tim David b Jason Behrendorff, Lucknow Super Giants 12/1 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
दोन षटकात बिनबाद 12 धावा
Match 63. 1.6: Chris Jordan to Quinton De Kock 6 runs, Lucknow Super Giants 12/0 https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल
आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी हे आम्हाला माहीत आहे, एक चांगला ट्रॅक दिसतो पण तो कसा असेल याची खात्री नाही. आम्ही आव्हानासाठी तयार आहोत. सीमर्सही खूप प्रभावी आहेत, त्यामुळे आम्हाला 4 सीमर्स आणि 2 स्पिनर मिळाले. प्रत्येक खेळ महत्त्वाचा असतो आणि विशिष्ट दिवशी कोणीही कोणालाही हरवू शकतो. आम्ही एक बदल केला. आमच्याकडे डावखुरा फिरकीपटू आहे.
Match 63. Mumbai Indians won the toss and elected to field. https://t.co/yxOTeCROIh #TATAIPL #LSGvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2023
लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.
मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.