MI vs LSG Highlights Score, आयपीएल 2024: लखनऊचा 18 धावांनी विजय, मुंबईवर मात
Mumbai Indians vs Lucknow Super Giants IPL 2024 Highlights in Marathi: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील साखळी फेरीतील अखेरचा सामना होता.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या हंगामातील साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुल याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सा त्यांच्या घरच्या मैदानात 18 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा या मोसमातील 10 वा पराभव ठरला. मुंबईला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात फक्त 4 सामनेच जिंकता आले. मुंबईचं या पराभवासह या मोसमाती आव्हान हे 10 व्या स्थानी संपलं. तर लखनऊने आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात यश मिळवलं.
LIVE NEWS & UPDATES
-
MI vs LSG Live Updates : लखनऊचा विजय, पलटणचा पराभव
लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवला. लखनऊने विजयासाठी दिलेल्या 215 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 20 ओव्हरमध्ये 196 धावांपर्यंतच पोहचता आलं. मुंबईचा हा या हंगामातील एकूण 10 वा पराभव ठरला. तर लखनऊला या हंगामातील आपला अखेरचा सामना जिंकण्यात यश आलं.
-
MI vs LSG Live Updates : नेहल वढेरा आऊट
मुंबईने पाचवी विकेट गमावली आहे. नेहल वढेरा 1 धाव करुन आऊट झाला.
-
-
MI vs LSG Live Updates : मुंबईला चौथा धक्का, कॅप्टन हार्दिक आऊट
मुंबईला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा याच्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. त्यामुळे मुंबई अडचणीत सापडली आहे.
-
MI vs LSG Live Updates : रोहित शर्मा आऊट
मुंबईला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा 68 धावांवर आऊट झाला आहे.
-
MI vs LSG Live Updates : मुंबईला दुसरा धक्का, सूर्या झिरोवर आऊट
मुंबई इंडियन्सने शानदार सुरुवातीनंतर झटपट 2 विकेट्स गमावल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस याच्यानंतर सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्यकुमारला भोपळाही फोडता आला नाही. सूर्या तिसऱ्या बॉलवर झिरोवर बाद झाला.
-
-
MI vs LSG Live Updates : हिटमॅनचं खणखणीत अर्धशतक
मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सिक्स ठोकत अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने 28 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
-
MI vs LSG Live Updates : मुंबईची कडक सुरुवात
मुंबईने 215 धावांच्या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना शानदार सुरुवात केली आहे. मुंबईच्या सलामी जोडीने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 53 धावा केल्या आहेत.
-
MI vs LSG Live Updates : पाऊस थांबला, सामन्याला 10 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होणार
मुंबई-लखनऊ सामन्यात सुरु झालेल्या पावसाने अखेर उसंत घेतली आहे. काही मिनिटांच्या जोरदार बॅटिंगनंतर पाऊस थांबला आहे. त्यामुळे आता मिळालेल्या माहितीनुसार, 10 वाजून 50 मिनिटांनी पुन्हा सामन्याला सुरुवात होणार आहे. लखनऊने मुंबईला 215 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या सलामी जोडीने पाऊस येण्यासाठी 3.5 ओव्हरमध्ये बिनबाद 33 धावा केल्या आहेत.
-
MI vs LSG Live Updates: पावसामुळे खेळ थांबला
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे. रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी पावसाची एन्ट्री झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. खेळपट्टी कव्हर्सने झाकण्यात आली आहे. मुंबईने 215 धावांचा पाठलाग करताना खेळ थांबेपर्यंत 3.5 ओव्हरमध्ये 33 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 20 आणि डेवाल्ड ब्रेव्हिस 9 धावा नाबाद आहेत.
-
MI vs LSG Live Updates: मुंबईसमोर 215 धावांंचं आव्हान
लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनऊकडून निकोकल पूरन आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर आयुष बदोनी याने फिनिशिंग टच दिला. या जोरावर लखनऊने 200 पार मजल मारली.
-
MI vs LSG Live Updates: लखनऊला सलग 3 झटके
मुंबईने लखनऊला सलग 2 झटके दिले आहेत. नुवन तुषारा याने निकोलस पूरन याच्यानंतर दुसऱ्याच बॉलवर अर्शद खान याला झिरोवर आऊट केलं. निकोलसने 29 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली. नुवान तुषारा याने अशाप्रकारे 17 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 बॉलवर लखनऊला 2 झटके दिले. त्यानंतर पीयुष चावला 18 वी ओव्हर टाकायला आला. पीयूषने कॅप्टन केएल राहुल याला 55 धावांवर आऊट केलं.
-
MI vs LSG Live Updates: चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
निकोलस पूरन आणि केएल राहुल या जोडीने लखनऊसाठी नाबाद शतकी भागीदारी केली आहे. या दोघांनी 44 बॉलमध्ये 101 धावांची नाबाद भागीदारी केली. निकोलसने या दरम्यान अर्धशतक ठोकलं. तर केएलने निकोलसला चांगली साथ दिली.
-
MI vs LSG Live Updates: निकोसल पूरनचं सिक्ससह विस्फोटक अर्धशतक
निकोलस पूरन याने सलग 2 सिक्स खेचत अवघ्या 19 बॉलमध्ये विस्फोटक अर्धशतक ठोकलं आहे. निकोलस या अर्धशतकी खेळीत 7 सिक्स आणि 2 चौकार ठोकले.
-
MI vs LSG Live Updates: नेहल वढेराचा कडक कॅच, दीपक हुड्डा आऊट
मुंबईने लखनऊला तिसरा झटका दिला आहे. पीयूष चावला याने दीपक हुड्डा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेहल वढेरा याने अफलातून कॅच घेत दीपकला कॅच आऊट केलं.
-
MI vs LSG Live Updates: मार्कस स्टोयनिस आऊट
पीयूष चावला याने लखनऊला दुसरा झटका देत आपलं विकेटचं खातं उघडलं आहे. पीयूषने मार्कस स्टोयनिस याला 28 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. लखनऊची अशाप्रकारे 6 ओव्हरनंतर 2 बाद 49 अशी धावसंख्या झाली आहे.
-
MI vs LSG Live Updates: लखनऊला पहिला धक्का, देवदत्त डक
नवीन तुषारा याने लखनऊ सुपर जायंट्सला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल झटका दिला आहे. नवीनने देवदत्त पडीक्कल याला झिरोवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.
-
मुंबई आणि लखनऊची प्लेईंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
-
MI vs LSG Live Updates: पलटणने टॉस जिंकला
मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी अनेक बदल केले आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील अखेरचा सामना असल्याने हा प्रयोग करण्यात आला आहे.
-
मुंबईत मोदी आणि राज ठाकरेंची सभा, दुसरीकडे बीकेसीत मविआची मोठी सभा
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून सत्तांचा धडाका सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत आज महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. तर दुसरीकडे मुंबईत बीकेसीत महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आले आहेत.
-
MI vs LSG Live Updates: मुंबई विरुद्ध लखनऊ हेड टु हेड रेकॉर्ड्स, कोण वरचढ?
मुंबईने या हंगामात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी मुंबईला फक्त 4 सामने जिंकण्यात यश आलंय. तर 7 वेळा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे. मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामना झाले आहेत. त्यापैकी लखनऊने 4 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला केवळ 1 सामनाच जिंकण्यात यश आलंय.
-
MI vs LSG Live Updates: लखनऊ सुपर जायंट्स टीम
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.
-
MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.
-
मुंबई-लखनऊ आमनेसामने, कोण करणार शेवट गोड?
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील हा अखेरचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांता हा सामना जिंकून शेवट गोड करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.
Published On - May 17,2024 5:58 PM