MI vs PBKS IPL 2023 Highlights | मुंबई इंडियन्सचा रंगतदार सामन्यात पराभव, पंजाब किंग्सने विजयी घोडदौड रोखली

| Updated on: Apr 23, 2023 | 1:05 AM

MI vs PBKS IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. पंजाबने या सामन्यात मुंबईवर विजय मिळवला.

MI vs PBKS IPL 2023 Highlights | मुंबई इंडियन्सचा रंगतदार सामन्यात पराभव, पंजाब किंग्सने विजयी घोडदौड रोखली

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात 22 मार्च रोजी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं होतं. पंजाबने मुंबईवर या सामन्यात 13 धावांनी विजय मिळवला. पंजाबने मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 201 धावाच करता आला. पंजाबचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. तर मुंबईचा सलग 3 सामन्यानंतर पराभव झाला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Apr 2023 11:34 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | मुंबईची विजयी घोडदौड पंजाबने रोखली

    पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सची  विजयी घोडदौड रोखलीय. पंजाबने पहिले बॅटिंग करताना मुंबईला 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईनेही या आव्हानाचा शानदार पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.  मात्र मुंबईचे प्रयत्न थोडक्यासाठी अपुरे पडले. मुंबईने हा सामना अवघ्या 13 धावांनी गमावला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स 201 धावा केल्या.

  • 22 Apr 2023 10:56 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | कॅमरुन ग्रीन आऊट, मुंबईला तिसरा धक्का

    मुंबई इंडियन्सने तिसरी विकेट गमावली आहे.  कॅमरुन ग्रीन शानदार अर्धशतकी खेळीनंतर आऊट झाला आहे.  ग्रीनने 43 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 खणखणीत सिक्स ठोकले.

  • 22 Apr 2023 10:23 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | रोहित शर्मा आऊट, मुंबईला दुसरा झटका

    मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. कॅप्टन रोहित शर्मा 44 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 22 Apr 2023 10:09 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    मुंबई इंडियन्सने पहिली विकेट स्वसतात गमावल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.  रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली आहे.

  • 22 Apr 2023 09:51 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | मुंबईला पहिला धक्का

    मुंबई इंडियन्सने पहिली विकेट गमावली आहे.  इशान किशन आऊट झालाय.  पंजाब किंग्सने मुंबईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले आहे.  या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची निराशाजनक सुरुवात झालीय.

  • 22 Apr 2023 09:39 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबचा मुंबईत तडाखा, पलटणसमोर 215 रन्सचं टार्गेट

    पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना तब्येतीचा फोडून काढला आहे. सामन्याच्या 12 ओव्हरपर्यंत बरोबरीत असलेला सामना पंजाबच्या बाजूने झुकला. त्यानंतर पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांची सालटी सोलून काढली. पंजाबच्या प्रत्येक फलंदाजाने मिळालेल्या संधीचा मजबूत फायदा घेत तुफान फटकेबाजी केली. हरप्रीत ब्रार याचा अपवाद वगळता पहिल्या सात फलंदाजांनी धमाका केला. मॅथ्यू शॉर्ट याने 11, प्रभासिमरन सिंह 26, अथर्व तायडे 29, लियाम लिविंगस्टोन 10, भाटीया 41, सॅम करन 55 आणि जितेश याने 25 रन्स केल्या. तर हरप्रीत ब्रार 5 धावांवर रनआऊट झाला. तर शाहरुख खान शून्यावर नाबाद राहिला. मुंबईकडून पियूष चावला आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर, बेहरनडोर्फ आणि जोफ्रा आर्चर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 22 Apr 2023 08:25 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला चौथा झटका

    पंजाब किंग्सने चौथी विकेट गमावली आहे. अथर्व तायडे आऊट झाला आहे.  पियूष चावला याने अर्थवला क्लिन बोल्ड केलं.

  • 22 Apr 2023 08:23 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | लियाम लिविंगस्टोन आऊट, पंजाबला तिसरा धक्का

    पंजाब किंग्सने तिसरी विकेट गमावली आहे.  विकेटकीपर इशान किशन याने पियूष चावला याच्या बॉलिंगवर लियाम लिविंगस्टोन याला  स्टंपिंग आऊट केलं.

  • 22 Apr 2023 08:10 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | अर्जुन तेंडुलकर याचा कडक यॉर्कर, प्रभासिमरन सिंह आऊट

    अर्जुन तेंडुलकर याने पंजाब किंग्सला दुसरा झटका देत पहिली विकेट मिळवली आहे.  अर्जुनने यॉर्कर बॉल टाकत  प्रभासिमरन सिंह याला एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

  • 22 Apr 2023 07:51 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला पहिला धक्का, मॅथ्यू शॉर्ट आऊट

    मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पहिला धक्का दिला आहे. कॅमरुन ग्रीन याने मॅथ्यू शॉर्ट याला पियूष चावला याच्या हाती कॅचआऊट केलं आहे.

  • 22 Apr 2023 07:33 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाब किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने पंजाबला टॉस जिंकून बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे.  पंजाबकडून मॅथ्यू शॉट आणि प्रभासिमरन सिंह ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 22 Apr 2023 07:26 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

  • 22 Apr 2023 07:05 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला

    मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून पंजाब किंग्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 22 Apr 2023 06:22 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | आकडेवारी कोणाच्या बाजूने?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 29 वेळा आमनेसामने राहिले आहेत. यामध्ये दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ राहिले आहेत. मुंबईने पंजाबवर 15 सामन्यात विजय मिळवलाय. तर पंजाबनेही मुंबईला 14 वेळा पाणी पाजलंय.

  • 22 Apr 2023 06:11 PM (IST)

    MI vs PBKS IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने

    शनिवारी 22 एप्रिल रोजी आयपीएल 16 व्या मोसमात डबल हेडरचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Published On - Apr 22,2023 6:09 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.