Naveen-ul-Haq Virat Kohli : नवीन उल हक सुधारणार नाही, विराट कोहली आऊट झाल्यावर… सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Naveen-ul-Haq on Virat Kohli : नवीन उल हक याने पुन्हा एकदा विराट कोहली याला डिवचलं आहे. विराट आऊट झाल्यावर त्याने इन्स्टावर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

Naveen-ul-Haq Virat Kohli : नवीन उल हक सुधारणार नाही, विराट कोहली आऊट झाल्यावर... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 8:48 PM

मुंबई : मुंबई  इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरू आहे. मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यावर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबी संघाची सुरूवात एकदम खराब झालेली पाहायला मिळाली. विराट कोहली पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. विराट आऊट झाल्यावर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू नवीन उल हक याने एक पोस्ट केली आहे.

नवीनने केलली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गौतम गंभीर, नवीन उल हक आणि विराट कोहली यांची भांडणं जवळपास सर्व क्रिकेट विश्वाने पाहिली आहेत. हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर कोहलीने लखनऊच्या सामन्यावेळी वृद्धिमान साहाचं कौतक करतानाची पोस्ट केली. त्यानंतर आज कोहली बाद झाल्यावर नवीनने पोस्ट केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

त्या दिवशी झालेली भांडणं मिटलीत असं सर्वांना वाटलं खरं पण तसं काही झालेलं दिसत नाही. उलट आता हे प्रकरण आणखी चिघळणार असं दिसत आहे.

मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने आपल्या दोन्ही ओव्हरमध्ये आरसीबीच्यादोन फलंदाजांना आऊट केलं. विराट कोहली मोठा फटका खेळण्याचा नादाच आऊट झाला. त्यानंतर आलेल्या अनुज रावत यानेही फार काही चमक दाखवली नाही. दोघांना आऊट केल्यावर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी डाव सावरला.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.