MI vs RCB IPL 2023 Highlights : मुंबई इंडिअन्सकडून आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

| Updated on: May 10, 2023 | 12:52 AM

MI vs RCB IPL 2023 Highlights Score : या विजयासह मुंबई इंडियन्सने मोठी झेप घेतली असून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

MI vs RCB IPL 2023 Highlights : मुंबई इंडिअन्सकडून आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा

मुंबई : मुंबई इंडियन्सने या मोसमाच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूव झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.मुंबई संघाने बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. 200 धावांचं लक्ष्य अवघ्या 16.3 षटकांत पूर्ण करून मोसमातील सहावा विजय नोंदवला. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने 83 धावांची अप्रतिम खेळी खेळली, तर नेहल वढेरा (52) यानेही सलग दुसरे अर्धशतक झळकावलं. , कर्णधार फाफ डुप्लेसी (65) आणि ग्लेन मॅक्सवेल (68) यांनी बंगळुरूकडून दमदार खेळी केली होती. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 10 May 2023 12:44 AM (IST)

    MI vs RCB

    मुंबईने दणदणीत विजय नोंदवल असून अवघ्या 16.3 षटकांत बंगळुरूचे 200 धावांचे लक्ष्य पार केलं. नेहल वढेराने अर्धशतक झळकावलं आणि हर्षल पटेलला सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला. यासह मुंबईने या मोसमात तिसऱ्यांदा 200 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठलं आहे.

  • 09 May 2023 11:05 PM (IST)

    MI vsRCB : सामना मुंबईच्या हातात

    15 षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या 2 बाद 175 आहे. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वढेरा आणि सूर्या यांच्यात 100 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

  • 09 May 2023 10:33 PM (IST)

    MI vs RCB :

    MI vs RCB : 9 षटकांनंतर, मुंबई इंडियन्सची धावसंख्या 2 गडी बाद 89 आहे. सूर्या आणि वढेरा मैदानात खेळत आहेत.

  • 09 May 2023 10:08 PM (IST)

    मुंबई बॅकफूटवर

    5 Over : 52-5

    मुंबई इंडिअन्सने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वानिंदू हसरंगाने इशान किशन 42 धावा आणि रोहित शर्मा यांना आऊट केलं आहे.

  • 09 May 2023 10:01 PM (IST)

    MI vs RCB : मुंबईची झकास सुरूवात

    मुंबईने झकास सुरूवात केली आहे. सलामीवीर इशान किशन याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवलं आहे. 4 ओव्हरमध्ये मुंबईने 41 धावा केल्या आहेत.

  • 09 May 2023 08:52 PM (IST)

    MI vs RCB : फाफ आऊट

    महिपाल लोमरोर याला कुमार कार्तिकेय याने आऊट केलं आहे. त्यानंतर लगेचच आरसीबीला धक्का बसलाय. कर्णधार फाफ डू प्लेसिस याला कॅमेरून ग्रीन याने आऊट केलं आहे.

  • 09 May 2023 08:39 PM (IST)

    MI vs RCB : बेहरेनडॉर्फला तिसरं यश

    ग्लेन मॅक्सवेल 68 धावांवर बाद झाला आहे. जेसन बेहरेनडॉर्फनेच त्याला नेहल वढेराकडे झेल देण्यास भाग पाडलं आणि आक्रमक मॅक्सी आऊट झाला आहे. या खेळीमध्ये त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत.

  • 09 May 2023 08:32 PM (IST)

    फाफ डू प्लेसिसचं अर्धशतक

    मॅक्सवेलनंतर फाफ डू प्लेसिसने आपलं अर्धशथक पूर्ण केलं आहे. 30 चेंडूत त्याने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने आपली हाफ सेंच्युरी केली आहे.

  • 09 May 2023 08:27 PM (IST)

    MI vs RCB : आरसीबीचं शतक

    10 ओव्हरनंतर आरसीबीच्या 104 धावा, मॅक्सवेल आणि प्लेसिस यांनी जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली आहे. ग्लेन मॅक्सवेलने 25 बॉल 50 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.

  • 09 May 2023 08:17 PM (IST)

    MI vs RCB : मॅक्सवेल आणि फाफ फॉर्ममध्ये

    आरसीबीने 8 षटकांत 2 बाद 81 धावा केल्या आहेत. मॅक्सवेल आणि प्लेसिसने संपूर्ण सामना फिरवला आहे. मॅक्सवेल 20 चेंडूत 43 तर फाफ डू प्लेसिस 21 चेंडूत 32 धावांवर खेळत आहे. दोघेही सहज चौकार आणि षटकार मारत आहेत.

  • 09 May 2023 08:11 PM (IST)

    MI vs RCB :

    आरसीबी 6 ओव्हरनंतर 2 बाद 56. फाफ डू प्लेसिस 26 आणि ग्लेन मॅक्सवेल 23 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये 40 धावांची भागीदारी झाली आहे.

  • 09 May 2023 07:46 PM (IST)

    MI vs RCB : अनुज रावत आऊट

    जेसन बेहरेनडॉर्फच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनुज रावतने अतरंगी फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही यशस्वी झाला नाही. 6 धावांवर तो आऊट झाला आहे. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला आहे.

  • 09 May 2023 07:38 PM (IST)

    MI vs RCB : विराट कोहली आऊट

    पहिल्याच ओव्हरमध्ये नेहल वढेराने फाफ डू प्लेसिस याचा कॅच सोडला होता. त्यानंतर जेसन बेहरेनडॉर्फला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली कॅच आऊट झाला. 1 धावा काढून तो माघारी परतला, इशान किशनने त्याचा कॅच घेतला.

  • 09 May 2023 07:19 PM (IST)

    MI vs RCB : पॉइंट टेबलमध्ये मिळणार मोठी बढती

    मुंबईच्या बालेकिल्ल्यात घुसून बंगळुरू पलटणला करणार उद्ध्वस्त, दोन्ही संघांमध्ये आज जो बाजी मारणार तो थेट तिसऱ्या क्रमांकावर पॉइंट टेबलमध्ये जाणार आहे.

  • 09 May 2023 07:09 PM (IST)

    बंगळुरू प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

  • 09 May 2023 07:08 PM (IST)

    मुंबई प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

  • 09 May 2023 07:07 PM (IST)

    मुंबईने जिंकला टॉस

    मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यावर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात मुंबईकडून ख्रिस जॉर्डन याने पदार्पण केलं आहे. आयपीएलमधून बाहेर झालेल्या जोफ्रा आर्चरच्या जागेवर त्याला संधी मिळाली आहे.

  • 09 May 2023 06:57 PM (IST)

    MI vs RCB :

    जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने रोहित शर्माच्या खराब फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामागील कारणाबद्दलही तो उघडपणे बोलला आहे. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीत कोणतीही तांत्रिक कमतरता नसल्याचे तो म्हणाला. त्याच्या खराब फॉर्मचे कारण म्हणजे त्याची मानसिक स्थिती आहे.

  • 09 May 2023 04:17 PM (IST)

    MI vs RCB : सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

    मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे. वास्तविक, मुंबई इंडियन्सचा (MI) जोफ्रा आर्चर हा मॅचनिनर खेळाडू IPL 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी मोठा धक्का आहे,

Published On - May 09,2023 4:08 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.