MI vs RCB | रोहित शर्मा आरसीबी विरुद्धच्या प्रतिष्ठेच्या सामन्यातून ‘आऊट’?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या आर पारच्या लढाई आधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

MI vs RCB | रोहित शर्मा आरसीबी विरुद्धच्या प्रतिष्ठेच्या सामन्यातून 'आऊट'?
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 4:18 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आज 9 मे रोजी क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. विराट विरुद्ध रोहित असा हा थेट सामना असणार आहे. मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांची या पर्वात सारखीच स्थिती आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळळेल्या 10 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत विजय मिळवून हंगामातील 6 वा विजय आणि कडवट प्रतिस्पर्ध्यावर मात असे दोन्ही उद्देश साध्य करण्याचा हेतू मुंबई आणि आरसीबीचा असणार आहे. मात्र यात दोघांपैकी कुणी एकच टीम यशस्वी होईल.

तसेच हा सामना जिंकणारा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहचेल, जे प्लेऑफ क्वालिफाय होण्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. मात्र या सर्वात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. आधीच जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झालाय. त्याच्या जाही ख्रिस जॉर्डन याचा समावेश करण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडिनयन्सचा कर्णधार आरसीबी विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव पलटणचं नेतृत्व करणार असल्याची चर्चा आहे.

रोहित शर्मा खेळणार नाही?

रोहित शर्मा आरसीबी विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याचं समजतंय. याचं कारण अजूनही स्पष्ट नाही. मात्र रोहित सलग 2 सामन्यात झिरोवर आऊट झाला. तसेच आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून रोहित खेळणार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र अजूनही निश्चित कारण समोर आलेलं नाही.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, ख्रिस जॉर्डन, जेसन बेहरेनडॉर्फ, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, डुआन जॅन्सन, राघव गोयल आणि रिले मेरेडिथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम | विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वनिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, हर्षल पटेल, सिराज पटेल. कौल, केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, वैशाक विजयकुमार, फिन ऍलन, सोनू यादव, मनोज भंडागे, शाहबाज अहमद, आकाश दीप, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.