MI vs RCB : मुंबई इंडियन्स IPL 2021 मधला सलामीचा सामना गमावणार?

आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकमेंकांविरोधात आव्हान उभं करतील.

MI vs RCB : मुंबई इंडियन्स IPL 2021 मधला सलामीचा सामना गमावणार?
Rohit Sharma
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 4:56 PM

मुंबई : आयपीएलचा 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून (उद्या) सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ (MI vs RCB) एकमेंकांविरोधात आव्हान उभं करतील. आयपीएल 2021 चा हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स गमावणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे जिंकणे अशक्य आहे. हे आम्ही नव्हे तर आयपीएलचा आजवरचा इतिहास सांगतोय. (MI vs RCB : Mumbai Indians can loose IPL 2021 Opening match)

IPL 2021 च्या माध्यमातून दोन वर्षानंतर ही स्पर्धा भारतात परतली आहे. IPL 2019 ही स्पर्धा भारतीय भूमीवर खेळवण्यात आली होती. तर IPL 2020 ही स्पर्धा कोरोना साधीच्या रोगामुळे यूएईमध्ये पार पडली. मात्र, दोन वर्षानंतर भारतात परतणार्‍या या स्पर्धेची सुरुवात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवाने होऊ शकते, असा दावा आजवरचा इतिहास पाहून केला जात आहे.

2013 पासून दरवर्षी सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव!

सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ पराभूत होणार असं आम्ही का म्हणतोय, हे समजून घ्या. मुंबई इंडियन्सने 2013 पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल 2013 च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. जसप्रीत बुमराहने याच सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 2013 पासून आतापर्यंत आयपीएलचे 7 हंगाम संपुष्टात आले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता 8 व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रोहितचा चेन्नईमधला विजयरथ थांबणार?

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा आजवरचा इतिहास पाहता चेन्नईमधील कर्णधार रोहित शर्माचा विजयरथ थोपवला जाईल, असं वाटतंय. मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वात चेन्नईत 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सवर मात केली आहे. म्हणजेच पराभव हिटमॅनपासून खूप दूर आहे. पण, गेल्या 7 वर्षांपासून आयपीएलमधील सुरुवातीचे सामने मुंबई इंडियन्सने गमावण्याची परंपरा सुरु ठेवली तर, यावेळी रोहितची चेन्नईतील अजिंक्य मोहीम संपुष्टात येऊ शकते. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार चेन्नईत कधीही विजयी झालेला नाही. विराट कोहली चेन्नईच्या खेळपट्टीवर आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक करणार?

रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 च्या स्पर्धेचे जेतेपद मुंबईने पटकावले आहे. यंदा ही स्पर्धा जिंकून विजेतेपद मिळवण्याची हॅटट्रिक करायची, असा मनसुबा मुंबईच्या संघाने आखला आहे. 9 एप्रिलला ही स्पर्धा सुरु होणार असून, मुंबईचा पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरोधात आहे. यंदा आयपीएलमध्ये एकूण 56 लीग सामने खेळवले जातील. सर्व सामने चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, मुंबई आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.

संबंधित बातम्या 

VIDEO : आगरी गाण्यावर रोहित शर्माचा ठेका, मुंबई पलटणचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल

IPL 2021 : आरसीबीसाठी धोक्याची घंटा, एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा पोलार्डचा पुन्हा धुमाकूळ, मुंबईकडून Video शेअर

IPL 2021 : उसेन बोल्टचा RCB ची जर्सी परिधान करत विराट कोहलीला खास मेसेज, म्हणतो, ‘लक्षात ठेवा…’

(MI vs RCB : Mumbai Indians can loose IPL 2021 Opening match)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.