MI vs RR IPL 2023 Score : सलग तीन सिक्स मारत डेविडने मुंबईला मिळवून दिला थरारक विजय
Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2023 Score in Marathi : राजस्थान रॉयल्सने मोठी धावसंख्या उभारली होती. पण सूर्यकुमार यादव आणि शेवटी टीम डेव्हिडने त्यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेत मुंबईला विजय मिळवून दिला.
मुंबई : आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 6विकेट्सने पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या. मुंबई संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 गडी राखून आयपीएलचा 1000 वा सामना जिंकला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना टीम डेविड याने सलग 3 सिक्सर मारत राजस्थान संघाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान
LIVE Cricket Score & Updates
-
मुंबई इंडियन्सने जिंकला 1000 वा सामना
मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील 1000 वा सामना जिंकला आहे. रोमहर्षक सामन्यात त्यांनी राजस्थानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानसाठी जेसन होल्डरच्या पहिल्या तीन चेंडूंवरटीम डेव्हिडने सलग तीन षटकार ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला.
-
MI vs RR Live Score : सूर्या आऊट
मुंबई इंडियन्सची चौथी विकेट 152 धावांवर पडली गेली आहे. सूर्यकुमार यादव 29 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. संदीप शर्माने ट्रेंट बोल्टचा अप्रतिम झेल घेत त्याला तंबूचा मार्ग दाखवला असून टीम डेविड मैदानात उतरला आहे.
-
-
सूर्यकुमारचं वानखेडेवर वादळ
सूर्यकुमार यादव याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. अवघ्या 24 चेंडूत त्याने 50 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. अद्यापह 33 चेंडूत 68 धावांची गरज मुंबईला आहे.
-
MI vs RR Live Score
MI vs RR :
सहा ओव्हरनंतर मुंबईने एक विकेट गमावून 58 धावा केल्या आहेत. सध्या कॅमेरून ग्रीन 15 चेंडूत 30 आणि ईशान किशन 16 चेंडूत 21 धावांवर करत फलंदाजी करत आहे. ग्रीन शानदार फलंदाजी करत आहे. रोहित 3 धावा करून बाद झाला.
-
मुंबईला पहिला धक्का
राजस्थान रॉयल्सच्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची पहिला धक्का बसला आहे. 14 धावांवर असताना रोहित शर्माला संदीप शर्माने बाद केलं.
-
-
MI vs RR : मुंबई लक्ष्य पूर्ण करणार?
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 212 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 124 धावा केल्या. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. मुंबई आव्हान पार करते की नाही पाहावं लागणार आहे.
-
MI vs RR : जयस्वालचं ‘यशस्वी’ शतक
यशस्वी जयस्वालने आयपीएल 2023 मध्ये पहिले शतक पूर्ण केले आहे. जयस्वालने 14 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या मोसमात शतक करणारा तो तिसरा आणि दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी सनरायझर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूक आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी व्यंकटेश अय्यर यांनी शतके झळकावली आहेत. जयस्वालच्या शतकी खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या 200 धावांच्या जवळ पोहोचली आहे.
-
MI vs RR : पडिक्कल आऊट
राजस्थान रॉयल्सची तिसरी विकेट पडली. देवदत्त पडिक्कल चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला आहे. पियुष चावलाने त्याला क्लीन बोल्ड केले. आता यशस्वी जैस्वालसोबत जेसन होल्डर क्रीजवर आहे. राजस्थानची धावसंख्या 12 षटकांत 3 बाद 113 अशी आहे.
-
MI vs RR :
यशस्वी जयस्वालने आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून 50 धावा पूर्ण केल्या. यासह राजस्थानच्या 100 धावाही पूर्ण झाल्या आहेत.
-
MI vs RR : बटलर आऊट
राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. जोस बटलर बाद झाला असून पियुष चावलाने सातव्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर त्याला कॅचआऊट केलं.
-
MI vs RR : पॉवर प्ले
राजस्थान रॉयल्स संघाने एकदम आक्रमक सुरुवात केली आहे. पॉवर प्ले मध्ये जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 65 धावा काढल्या. यामध्ये यशस्वी जयस्वालने 23 चेंडूत 41 धावा केल्या आहेत. तर बटलरने 14 चेंडूत 11 धावांची खेळी आहे.
-
कोण रचणार इतिहास?
आजच्या सामन्यातील विजयाने फक्त दोन गुणच नाहीतर मोठा विक्रम रचला जाणार आहे. आयपीएलमधील हा 1000 वा सामना आहे. राजस्थान की मुंबई कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs RR : अर्जुन तेंडुलकर बाहेर
दोन्ही संघाने बदल केलेले आहेत. मुंबई संघात जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथ परतले आहेत. तर अर्जुन तेंडुलकरला बाहेर बसवण्यात आलं आहे. राजस्थानमध्ये बोल्ट याने संघात कंमबॅख केलं आहे.
-
MI vs RR : दोन्ही संघांची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
मुंबई इंडिअन्स प्लेइंग 11
रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान
-
MI vs RR IPL : टॉस कोणाच्या पारड्यात
राजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
हेड टू हेड
इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा वरचष्मा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येतं. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 15 वेळा पराभव केला आहे. तर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 13 वेळा पराभव केला आहे.
Published On - Apr 30,2023 6:49 PM