MI vs UPW : क्रिकेटमध्ये DRS एक महत्त्वाच शस्त्र आहे. मॅचमध्ये अंपायरचा निर्णय पटला नाही, की खेळाडू DRS चा वापर करतात. DRS सिस्टिमवरुनही काहीवेळा वाद होतात. पण रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यात जे पहायला मिळालं, ते बिलकुल वेगळं होतं. या मॅचमध्ये DRS च्या निर्णयावरुन भरपूर ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने आपलाच निर्णय दोनवेळा पलटला.
खेळाडूंनी एका LBW वरुन DRS घेतला. थर्ड अंपायरने फुटेज पाहिल्यानंतर आधी आऊट असल्याचा निर्णय दिला. पण त्यानंतर पुन्हा हाच निर्णय बदलला.
ते क्वचितच याआधी कधी दिसलं होतं
मॅचमध्ये हे घडलं कधी? मुंबई इंडियन्सच्या इनिंग दरम्यान 5 व्या ओव्हरमध्ये हे घडलं. सोफी एक्लेस्टोनच्या या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर हेली मॅथ्यूज विरोधात जोरदार अपील झालं. फिल्ड अंपायरने बाद Not out चा निर्णय दिला. त्यानंतर यूपीच्या टीमने DRS चा वापर केला. त्यानंतर जे पहायला मिळालं, ते क्वचितच याआधी कधी दिसलं होतं. थर्ड अंपायरने आधी निर्णय दिला. त्यानंतर आपलाच निर्णय बदलला.
DO NOT MISS‼️
Here’s a look back at all the drama behind the Hayley Matthews DRS!
WATCH ?️? #TATAWPL | #UPWvMI https://t.co/CPCUeqUdYf
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2023
आऊट दिल्यानंतर निर्णयावर फेरविचार
थर्ड अंपायरने स्निकोमीटर आणि LBW साठी बॉल ट्रॅकिंगचा वापर करुन मुंबईची बॅट्समन हॅली मॅथ्यूजला आऊट दिलं. अंपायरच्या या निर्णयावर मॅथ्यूज निराश झाली. ती मैदानातच उभी राहिली. त्यावेळी अंपायरने पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर फेरविचार केला.
अंपायरने का बदलला निर्णय?
यावेळी थर्ड अंपायरने रिव्यू दुसऱ्या अँगलने पाहिला. चेंडू आणि बुटामध्ये खूप अंतर होतं. बॉल थेट बॅटवर लागला होता. टेक्निकल बिघाडामुळे स्निकोमीटरमध्ये हालचाल दिसली होती. त्यानंतर अंपायरने निर्णय बदलला व हेलीला नॉटआऊट दिलं,