…म्हणून वॉन म्हणतो, सगळे सामने याच स्टेडियमवर खेळवा…

ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्नमधील डॉकलँड्स स्टेडियममध्ये पाऊस पडणार नाहीच अशा छताची सुविधा करण्यात आली आहे.

...म्हणून वॉन म्हणतो, सगळे सामने याच स्टेडियमवर खेळवा...
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 8:31 PM

मेलबर्नः T20 विश्वचषक 2022 मध्ये पावसामुळे अनेक सामने विस्कळीत झाले होते. त्यामुळे आतापर्यंत तीन सामनेही रद्द करण्यात आले होते. पावसामुळे आता अनेक सामन्यांवर त्याचा परिणाम झाला होता. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला, आणि इंग्लंडने हा सामना पाच धावांनी हरला होता. या स्पर्धेत शुक्रवारी दोन सामने खेळवले जाणार होते, मात्र पावसामुळे दोन्हीही सामने रद्द करण्यात आले.

यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल वॉन यांनी म्हटले आहे की पावसाळा असला तरी छत असणाऱ्या स्टेडियमवर का हे सामने होऊ शकत नाही असा सवाल त्याने केला होता.

ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्नमधील डॉकलँड्स स्टेडियममध्ये अशा छताची सुविधा करण्यात आली आहे. ज्यावेळी पाऊस पडणार असेल किंवा ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी हे छत संपूर्ण मैदान व्यापून राहते, त्यामुळे स्टेडियमवर पावसाचा एक थेंबही पडत नाही. त्यामुळे खेळपट्टीही तशीच सुरक्षित राहते.

पाऊस पडत असला तरी संपूर्ण सामना या मैदानावर खेळता येतो, म्हणूनच मायकेल वॉन म्हणतो की, ऑस्ट्रेलियात पावसाळी हंगाम आहे आणि मेलबर्नमध्ये छताचे स्टेडियमही त्यामुळे हे स्टेडियम वापरण्यास काय हरकत आहे असा सवालही त्याने केला आहे.

याबाबत मायकल वॉनने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा श्रीलंकेत वादळ येते तेव्हा संपूर्ण मैदान व्यापून जाते जेव्हा हवामान स्वच्छ असते तेव्हा कव्हर काढले जातात आणि पाऊस थांबताच सामना सुरू होतो.

कारण मैदान ओले नसते. मेलबर्नमध्ये पाऊस पडत असताना एमसीजी दोन दिवस का झाकले नाही? असा त्याने सवाल केला होता.

पाऊस असूनही डॉकलँड्स स्टेडियमवर सामने खेळवले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत,आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे निश्चित करू शकतात की पाऊस पडल्यास या मैदानावर सामने खेळवले जाऊ शकते.

त्यामुळे या स्टेडियममुळे क्रिकेटच्या चाहत्यांचीही निराशा होणार नाही आणि सर्वच सामन्यांचा आस्वादही घेता येईल.

आणि सामनाही निकालात काढता येईल. सुपर-12 सामना रद्द झाल्यामुळे स्पर्धेत फारसा फरक पडणार नाही, परंतु उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीदरम्यान पावसामुळे संपूर्ण विश्वचषकातील आनंदावर विरजन पडू शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.