ENG vs SL : जो रूटने शतक ठोकताच विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पण…

इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात 427 धावांची खेळी केली. पण इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ 150 धावांच्या आतच तंबूत परतला. या सामन्यात जो रूटने शतकी खेळी केली. पण त्याची थेट तुलना विराट कोहलीशी केली गेली. पण झालं असं की..

ENG vs SL : जो रूटने शतक ठोकताच विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पण...
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 8:58 PM

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचं पारडं दुसऱ्या दिवशीच जड झालं आहे. कारण श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढावू शकते. इंग्लंडने पहिल्या डावात 10 गडी गमवून 427 धावा केल्या. तर पहिल्या डावात श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक संघ 150 धावांच्या आताच तंबूत परतला आहे. असं सर्व इंग्लंडच्या बाजूने चित्र असताना जो रूट आणि विराट कोहली यांची चर्चा रंगली आहे. खरं तर हा विषय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने समोर आणत डिवचलं आहे. त्याने जो रुटच्या शतकाचा संदर्भ देत विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मायकल वॉनने जो रूट आणि विराट कोहली यांची तुलना करणारी आकडेवारी पोस्ट केली आहे. जो रूट विराट कोहलीच्या पुढे असल्याचं या पोस्टच्या माध्यमातून त्याने दाखवलं आहे. जो रूटने कसोटीत 33, तर विराट कोहलीने 29 शतकं झळकावली आहेत.

मायकल वॉन विराट कोहलीला ट्रोल करताना एक गोष्ट विसरला की, विराट कोहली जो रूटपेक्षा 72 डाव कमी खेळला आहे. दुसरीकडे विदेशात कसोटी शतकांबाबत बोलायचं तर रुटने SENAI देशात फक्त 6 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचा हा आकडा 11 आहे. विराट कोहलीने मागच्या 4 वर्षात फक्त 2 शतकं झळकावली आहेत. तर जो रूटने 16 शतकं ठोकली आहेत. दरम्यान विराट कोहली पुढच्या वर्षात बरंच कसोटी क्रिकेट खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला शतकी खेळी करण्याची संधी आहे. जर या दोन सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली तर जो रूटशी स्पर्धा तीव्र होईल.

पुढच्या महिन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेवर लक्ष लागून असणार आहे. कारण टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला पराभूत केल्याने बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे बांगलादेशला हलक्यात घेणं महागडा पडू शकतं. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून होणार आहे.

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.