T20I WC 2024 मध्ये हा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन! पॅट कमिन्सला मोठा झटका
Australia T20i World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा यूएसए आणि वेस्टइंडिजमध्ये होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे.
मुंबई | आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं काही दिवसांपूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार ही स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जाहीर केलं होतं. तसेच हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याचंही शाह यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियानेही टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधार निश्चित केला आहे.
ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधाराचं नाव जाहीर करुन वनडे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्स याला मोठा धक्का दिला आहे. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृ्त्व करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे टीमचे हेड कोच एंड्रयू मॅकडोनाल्ड यांनी कर्णधार म्हणून मार्शच्या नावाचं स्वागत केलंय. एरॉन फिंच याच्यानंतर मिचेल मार्श याने सार्थपणे ऑस्ट्रेलियाचं टी 20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केलंय.
पॅटला डच्चू
पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियासाठी आपल्या नेतृत्वात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पॅटने कॅप्टन्सीमध्ये आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं अजिंक्यपद मिळवून दिलं. त्यानंतर वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. आता पॅट आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑलराउंडर म्हणून खेळताना दिसू शकतो.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चं वेळापत्रक
Get ready for the ultimate cricket carnival in the West Indies and the USA 🥁
Unveiling the fixtures for the ICC Men’s T20 World Cup 2024 🗓️ 🤩#T20WorldCup | Details 👇
— ICC (@ICC) January 5, 2024
टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन 1 ते 29 जून रोजी वेस्टइंडिज आणि यूएसएमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून एकूण 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. स्पर्धेतील 20 संघांना 5-5 नुसार 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रुपमधील पहिले 2 संघ सुपर 8 साठी क्वालिफाय करतील. त्यानंतर 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येईल. आता सुपर 8 मधून दोन्ही गटातील प्रत्येकी 2 संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील. सेमी फायनलमधून अंतिम फेरीतील संघ निश्चित होतील. त्यानंतर विश्व विजेता ठरेल.