Video : बिअरच्या ग्लासवर निशाणा ठेवूनच मारला की काय? मिशेलच्या सिक्सची चर्चा तर होणारच

| Updated on: Jun 11, 2022 | 9:42 AM

मिशलच्या षटकाराची चांगलीच चर्चा झाली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Video : बिअरच्या ग्लासवर निशाणा ठेवूनच मारला की काय? मिशेलच्या सिक्सची चर्चा तर होणारच
सिक्सर थेट बिअरच्या ग्लासात
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली:  क्रिकेटमध्ये (Cricket) अनेकदा आपण षटकार ग्राऊंटबाहेर गेल्याचं बघतो. अनेकवेळी स्टेडियमवर बसलेल्या क्रिकेटप्रेमी देखील हा षटकार आपल्याकडे आल्याचं पाहून आनंदी होतात. मात्र, आम्ही तुम्हाला एक असा षटकार सांगणार आहोत. ज्यामुळे एका चाहत्याला आपला बिअरचा (beer) आनंद घालवावा लागला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड (NZ vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी किवी संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 318 धावा करत दमदार सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डॅरिल मिचेल 81 आणि टॉम ब्लंडेल 67 धावांवर नाबाद राहिले. मिशेलने आपल्या खेळीदरम्यान एकूण दोन षटकार मारले. परंतु यातील एका षटकारामुळे न्यूझीलंड संघाच्या एका चाहत्याचं नुकसान झालं. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहिली. तो खूप व्हायरलंही झाल.

नेमकं काय झालं?

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. या सामन्यात डॅरिल मिचलेनं 81 आणि टॉम ब्लंडेल 67 धावांवर नाबाद राहिले. मिशेलने आपल्या खेळीदरम्यान एकूण दोन षटकार मारले. यातील एका षटकाराची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. विशेष म्हणजे या व्हिडीओमुळे मिशेलही चांगलाच चर्चेत राहिला. हे सगळं प्रकरण मैदानावर उपस्थित नसणाऱ्या लोकांना एका ट्विटच्या माध्यमातून कळालं. इंग्लंडच्या बर्मी आर्मीने ट्विट करून माहिती दिली की न्यूझीलंड संघाने चाहत्याच्या नुकसानीची भरपाई केली आहे. आणि बदली म्हणून त्याला बिअरचा ग्लास दिल्याचंही सांगितलं. किवी संघाच्या या मोठेपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील न्यूझिलंडच्या संघाचं मोठं कौैतुक कोतंय.  वसाचा खेळ संपल्यानंतर मिशेलने सुसान नावाच्या या चाहत्याला भेटले आणि तिच्यासोबत काही छायाचित्रेही दिली.

हे सुद्धा वाचा

ट्विटमधील व्हिडीओ पाहा, खूप रंजक आहे

मिशलच्या षटकाराची चांगलीच चर्चा झाली. जॅक लीचच्या षटकात त्याने षटकार मारला जो थेट स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याच्या बिअरच्या ग्लासमध्ये पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची दमदार सुरुवात

नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत चांगली सुरुवात केली. सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची शानदार भागीदारी केली. टॉम लॅथम 26 आणि विल यंग 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. न्यूझीलंडने हेन्री निकोल्स आणि डेव्हन कॉनवे यांच्या विकेट्स गमावल्या. निकोल्सला 16 धावांच्या स्कोअरवर जॅक क्रॉलीने स्लिपमध्ये जीवदान दिले. तो इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या चेंडूवर 30 धावा काढून यष्टिरक्षक बेन फॉक्सच्या हाती झेल देऊन परतला. तीन षटकांनंतर फॉक्सने कॉनवेचा (46) झेल घेतला तर गोलंदाज जिमी अँडरसन होता.डॅरिल मिशेल 147 चेंडूत 81 धावा आणि टॉम ब्लंडेल 136 चेंडूत 67 धावा करत पहिल्या दिवशी खेळत आहे.