टी20 वर्ल्डकपमधील रोहित शर्माला टाकलेल्या त्या पाच चेंडूबाबत मिचेल स्टार्कची जाहीर कबुली, म्हणाला…

सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडलं होतं. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय फसला कारण रोहित शर्माने गोलंदाजांना धू धू धुतला.

टी20 वर्ल्डकपमधील रोहित शर्माला टाकलेल्या त्या पाच चेंडूबाबत मिचेल स्टार्कची जाहीर कबुली, म्हणाला...
Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 9:49 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियापुढे 205 धावांचं आव्हान उभं राहिल. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 गडी गमवून 181 धावा केल्या. टीम इंडियाने या सामन्यात 24 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माची खेळी निर्णायक ठरली. या सामन्यात मिचेल स्टार्कने 4 षटकात 45 धावा देत 2 गडी बाद केले. त्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची विकेट होती.या सामन्यात रोहित शर्माची विकेट जरी काढली असली तरी सर्वात जास्त त्यानेच धुतलं होतं.

मिचेल स्टार्कने या सामन्यात पहिलं षटक टाकलं. पहिल्या दोन चेंडूवर धाव घेता आली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक बदलली. त्यानंतर रोहित आणि मिचेल स्टार्कचा सामना तिसऱ्या षटकात झाला. या षटकात रोहितचं आक्रमक रूप दिसलं. पहिल्या दोन चेंडूंवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारला. या षटकात आवांतर धावा पकडून एकूण 29 धावा आल्या. स्टार्क पुन्हा 12 षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने रोहितला बाद केला. मात्र रोहितने फोडून काढलेल्या पाच चेंडूबाबत आता त्याने खुलासा केला आहे.

“मी त्याच्याविरुद्ध खूप खेळलो आहे. त्याने ही स्पर्धा चांगली खेळली होती. विशेषत: आमच्या सामन्यात मला वाटते की त्याने सेंट लुसियामध्येही त्या वाऱ्याला लक्ष्य केले. मी माझ्या स्पेलमध्ये भारताविरुद्ध पाच खराब चेंडू टाकले. रोहित शर्माने त्या पाच चेंडूवर षटकार मारले.” असं मिचेल स्टार्कने हसत हसत सांगितलं. खरं तर रोहित शर्माने 4 षटकार आणि एक चौकार मारला होता. पण तो स्पेल मिचेल स्टार्क अजूनही विसरला नाही हे विशेष. दुसरीकडे, 2026 टी20 वर्ल्डकप खेळणार का? असा प्रश्न विचारल्यावर मिचेल स्टार्कने सांगितलं की, मला माहिती नाही, कदाचित मी त्या संघात बसेन. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर 8 फेरीतच संपुष्टात आलं होतं. कारण अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून सर्वच समीकरण बदलून टाकलं होतं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....