Hasin Jahan Video : ‘तो चांगले पैसे कमवेल म्हणजे…’; हसीन जहाँचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हिचा तर पैशावर जीव!

Moahmmed Shami Wife Hasin jahan : भारताचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शमी चांगले पैसे कमवेल म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र तिने वर्ल्ड कपसाठी त्याला शुभेच्छा द्यायला नकार दिला.

Hasin Jahan Video : 'तो चांगले पैसे कमवेल म्हणजे...'; हसीन जहाँचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हिचा तर पैशावर जीव!
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 12:34 PM

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घालताना दिसत आहे. तीनच सामन्यांमध्ये मोहम्मद शमी याने 16 विकेट घेत संघसाठी दमदार कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये संघात जागा मिळत नव्हती मात्र पंड्या जखमी झाल्यावर त्याला संघात जागा मिळाली. पहिल्याच सामन्यात गड्याने पाच विकेट घेतल्या होत्या. शमीने आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. शमीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही सुरळित नाही. शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरूद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप केला असून हे प्रकरण कोर्टात आहे. अशातच हसीन जहाँचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये हसीन जहाँ शमी बेस्ट विश नाही पण त्याच्या पैशाबाबत बोलताना दिसत आहे.

 नेमकं काय म्हणाली हसीन जहाँ?

मी क्रिकेट पाहत नाही आणि मी कोणत्याही खेळाडूची फॅन नाही ना क्रिकेटची फॅन नाही. शमीने किती विकेट घेतल्या हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. कारण मला काही महितीच नाही, काहीही असो चांगला खेळत आहे म्हणजे संघातील आपली जागा कायम ठेवेल. चांगला खेळला म्हणजे पैसे कमवेल म्हणजे आमचं भविष्य सुरक्षित होईल. टीम इंडियाला बेस्ट विशेश देईल पण त्याला देणार नाही, असं हसीन जहाँ बोलत असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

या व्हिडीओवरून हसीन जहाँला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. शमीजवळ असलेल्या पेशांवर तिचा डोळा असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हणत तिच्यावर निशाणा साधला आहे. तिला शमीचे फक्त पैसे हवेत तो नको असंही काही नेटकरी म्हणत आहेत. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं 2014 साली लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगीही असून 2018 साली जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. अजूनही  कोर्टात या प्रकरणाची केस सुरू आहे.

दरम्यान, मोहम्मद शमी भारतासाठी दमदार कामगिरी करत आहे. वर्ल्ड कपमध्ये भाराताने आता सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. येत्या सामन्यांमध्ये शमीकडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची  अपेक्षा असणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर...
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर....
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?.
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?.
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी.
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी.
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.