Asia Cup 2023 : पाकिस्तानची लायकी काय, बोलतात काय?, बारकलं पोरगं म्हणत जय शाह यांची उडवली खिल्ली!

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. याचाच धागा पकडत या वादावर आता पाकिस्तानच माजी खेळाडू मोहम्मद आमीर याने गरळ ओकली आहे. आमीरने थेट बीसीसीआयला फटकारलं आहे. 

Asia Cup 2023 : पाकिस्तानची लायकी काय, बोलतात काय?, बारकलं पोरगं म्हणत जय शाह यांची उडवली खिल्ली!
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 10:17 PM

मुंबई : आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये होणार आहे मात्र भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी स्पष्टपणे नकार कळवला आहे. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळायला सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानचं यजमानपद रखडलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. याचाच धागा पकडत या वादावर आता पाकिस्तानच माजी खेळाडू मोहम्मद आमीर याने गरळ ओकली आहे. आमीरने थेट बीसीसीआयला फटकारलं आहे.

काय म्हणाला मोहम्मद आमीर?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अनादर केला जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला काही किंमत नाही हे बीसीसीआय सतत दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही एखाद्या मुलाला चॉकलेट खाऊ नका असे सांगितलं की ते सारखं मी खाणार असं म्हणतं. त्याचप्रकारे पीसीबी काही पर्याय द्यायला गेलं की बीसीसीआय हवामान खराब आहे, मोठ्या प्रमाणत खर्च होईल आणि सुरक्षेची कारणं देत असल्याचं म्हणत मोहम्मह आमीरने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

एकच मॉडेल आहे आणि ते म्हणजे क्रिकेट. कोणताही देश असूदेत पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका किंवा बांगलादेश क्रिकेट हे खेळलं गेलं पाहिजे. उपकार करा लहान मुलांसारखा हट्ट करू नका, सुरक्षेचा मुद्दा असेल तर याआधी चार आंतरराष्ट्रीय संघ खेळून गेले आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार केला असल्याचं मोहम्मद आमीर म्हणाला.

पीसीबीच्ं हायब्रीड मॉडेल कसं आहे?

भारताचे सामने इतर ठिकाणी खेळवले जातील तर इतर संघ पाकिस्तानमध्ये खेळतील. मात्र, बीसीसीआयने हा प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नाही. संपूर्ण आशिया कप तटस्थ ठिकाणी खेळवण्याची बीसीसीआयची मागणी बीसीसीआयने केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.