Video : फिक्सिंगच्या जाळ्यातून अजूनही मोहम्मद आमिरची सुटका नाही, फॅन्सने भर मैदानात तोंडावर काढली इज्जत
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची सुपर 8 फेरीची वाट बिकट झाली आहे. अमेरिकेच्या कामगिरीवर आता सर्व काही अवलंबून आहे. असं असताना सोशल मीडियावर मोहम्मद आमिरचा एक व्हिडीओ वेगान व्हायरल होत आहे. यात काही चाहते त्याला 'फिक्सर-फिक्सर' म्हणून ओरडताना ऐकू येत आहे. त्यामुळे मोहम्मद आमिर चांगलाच संतापला होता.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याचा समावेश होता. मोहम्मद आमिर 2010 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्सिंगसाठी दोषी धरलं होतं. त्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली. जवळपास त्याचं संपूर्ण क्रिकेट करिअरच उद्ध्वस्त झालं. आयसीसीने त्याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी टाकली होती. तेव्हा त्याचं वय 18 वर्षे इतकं होतं. यानंतर आमिरने आपला गुन्हा कबुल केला आणि शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला. 2016 मध्ये त्याने पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. 2020 मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली होती. पण टी20 वर्ल्डकप संघात त्याचा समावेश केला गेला. मात्र फॅन्सना ही बाब रूचलेली नाही. त्यांनी भर मैदानात मोहम्मद आमिरच्या इज्जतीचे बाभाडे काढले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही फॅन्स त्याला तोंडावर फिक्सर बोलून डिवचताना दिसत आहेत.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानने हा सामना गमावला. कर्णधार बाबर आझमने षटक मोहम्मद आमिरच्या हाती सोपवलं होतं. पण त्याने 8 चेंडू टाकत 18 धावा दिल्या. तर भाराताविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद आमिरने चार षटकं चांगली टाकली. 23 धावा देत 2 गडी बाद केले. त्यामुळे टीम इंडियाला 119 धावांपर्यंत मजल मारता आली. पण पाकिस्तानला 113 धावा करता आल्या आणि 6 धावांनी पराभव झाला.
Muhammed Amir under attack for betraying his country and for criticizing Babar Azam too much without any cause pic.twitter.com/aA3jQh7KrU
— Leo 🎗️ (@larthbroke) June 12, 2024
पाकिस्तानच्या सुपर 8 फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. अमेरिकेच्या कामगिरीवर लक्ष लागून आहे. अमेरिकेचा शेवटचा सामना आयर्लंडशी आहे. या सामन्यात अमेरिकेचा पराभव झाला तर मात्र पाकिस्तानला संधी मिळू शकते. पण यासाठी पाकिस्तानचा नेट रनरेटही चांगला असणं गरजेचं आहे.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.