पाकिस्तानच्या खेळाडूंचा यू टूर्न सुरुच, निवृत्ती घेणारा मोहम्मद आमीर पुन्हा परतणार, पण एका अटीवर…

पाकिस्तान क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता.

पाकिस्तानच्या खेळाडूंचा यू टूर्न सुरुच, निवृत्ती घेणारा मोहम्मद आमीर पुन्हा परतणार, पण एका अटीवर...
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:36 PM

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) महिनाभरापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णायासह त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्थात पीसीबीने (PCB) आपला मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान मोहम्मद आमीर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. त्याने याबाबत म्हटलं आहे की, संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक याच्या नेतृत्वातील सपोर्ट स्टाफ हटवल्यानंतर तो पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार आहे. (Mohammad Amir says I will be available to play for Pakistan, Once Misbah and Co. leave)

पाकिस्तानी संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी त्याची पाकिस्तानी क्रिकेट संघात निवड झाली नव्हती. या दौऱ्यासाठी 35 खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये आमीरचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्याने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर मानसिक छळाचा आरोप करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. तसेच आमीरने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनुसवर त्याची प्रतिमा बदनाम केल्याचा आरोप केला होता. दरम्यान आमीरने आज एक ट्विट करुन पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाविरोधात आवाज उठवला आहे.

आमिरने आज एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाची व्यवस्थापन समिती हटवल्यानंतर मी पाकिस्तानी क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी उपलब्ध असेन. त्यामुळे तुमच्या कथित बातम्या विकण्यासाठी बनावट माहितीचा (Fake News) प्रसार करणं थांबवा.”

गेल्या आठवड्यात आमिर म्हणाला होता की, “पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलणं गरजेचं आहे. खेळाडूंना त्यांच्यासाठी वेळ आणि स्वातंत्र्य द्यायला हवं. ड्रेसिंग रुममधील भयावह वातावरण संपलं पाहिजे. हेच खेळाडू पुढे तुमच्यासाठी सामने जिंकणार आहेत.”

निवृत्तीच्या वेळी मोहम्मद आमिरचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्यात त्याने म्हटलं होतं की, “मी क्रिकेटपासून दूर जात नाहीये. आता असलेली परिस्थिती सर्वांना माहिती आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी 35 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये माझी निवड केली नाही. 35 जणांमध्ये निवड होत नाही, यावरुन माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं सिद्ध होतं. या क्रिकेट बोर्डासह आणखी क्रिकेट खेळता येईल, असं मला वाटत नाही. क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे”, असं आमीर या व्हिडीओत म्हणाला.

“मला वाटत नाही की आता मी कोणत्याही प्रकारचा छळ सहन करू शकतो. मी 2010 ते 2015 या दरम्यान अत्याचारांचा साक्षीदार आहे. मी काही काळ क्रिकेटपासून दूर होतो. मी माझ्या चुकीबद्दल मी दंड भरला. पीसीबीने माझ्यामध्ये खूप गुंतवणूक केली आहे, असं म्हणत माझ्यावर वारंवार मानसिक छळ केला जात आहे”, असा पुनरोच्चार आमीरने केला.

वयाच्या 17 वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण

मोहम्मद आमिरने वयाच्या 17 व्या वर्षी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आमीरने त्याच्या स्विंगने छाप पाडली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तो स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात तो सापडला. या फिक्सिंगमुळे आमीरवर 2010 मध्ये 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. जुलै 2016 मध्ये त्याने पुनरागमन केलं. पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून देण्यात आमीरने मोलाची भूमिका बजावली. त्याने टीम इंडियाविरोधातील अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 50 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 250 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान याआधी जून 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा

नवखे खेळाडू कांगारुंवर भारी, शोएब अख्तरकडून टीम इंडियाच्या युवासेनेचं कौतुक

तुला परत मानलं रे ठाकूर, शार्दूलच्या बॅटिंगवर विराट कोहली फिदा, मराठीत कौतुक

(Mohammad Amir says I will be available to play for Pakistan, Once Misbah and Co. leave)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.