Video : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सूर्यकुमारचं उत्तर येताच मोहम्मद रिझवानने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टेन्शनमध्ये आलं आहे. नुकतीच सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया व्हायरल झाली होती. त्यावर आता पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने प्रतिक्रिया दिली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून गेल्या एका वर्षापासून तयारी सुरु आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात येणार की नाही? यामुळे काय करावे तेच कळत नव्हतं. स्पर्धा पाकिस्तानात असली तरी अजून काही निश्चित नाही. असं असताना भारताने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतकंच काय पीसीबीने आयसीसीला थेट धमकीच दिली आहे. दरम्यान टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्याच्यासोबत काही क्रिकेटपटू आहेत. या व्हिडीओत पाकिस्तानी चाहत्यांनी सूर्यकुमारसोबत फोटो काढले. इतकंच काय तर एका चाहत्याने पाकिस्तानात का येत नाही? असा प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादव आश्चर्यचकीत झाला. इतकंच काय तर प्रत्युत्तर देत म्हणाला, आमच्या हातात काहीच नाही. असं असताना व्हाईट बॉल क्रिकेट कर्णधार मोहम्मद रिझवानने आपली म्हणणं समोर मांडलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने सांगितलं की, ‘आम्ही यात काहीच करू शकत नाही. हे सर्वस्वी पीसीबीच्या हातात आहे.’ इतकंच काय तर स्टार फलंदाज केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवचं नाव घेत सांगितलं की, जर ते पाकिस्तानात आले तर आम्ही त्यांचं जल्लोषात स्वागत करू. या दोघांव्यतिरिक्त जे कोण येतील त्याचं तसंच स्वागत होईल, असं त्याने पुढे सांगितलं. दरम्यान पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाकिस्तानने वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने मात दिली. आता तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 14 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये होईल.
View this post on Instagram
भारतीय संघ 2008 मध्ये शेवटचं पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर 2012 मध्ये राजकीय वातावरण तापलं आणि दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. असं असताना हे दोन्ही देश आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने उभे ठाकतात. या व्यतिरिक्त दोन्ही देशात एकही मालिका किंवा सामना पार पडलेला नाही. इतकंच काय तर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये भाग घेता येत नाही. भारत सरकारने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचलत थेट नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन करू इच्छित आहे. पण बीसीसीआयच्या नकारामुळे आयसीसीची अडचण झाली आहे. स्पर्धा यशस्वी व्हायची असेल तर भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ खेळणं महत्त्वाचं आहे.