Mohammad Shami : मोहम्मद शमीची टीममध्ये निवड, इशानचाही समावेश
Mohammad Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दुखापतीनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यातून अप्रितम कमबॅक केलं.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दुखापतीनंतर जवळपास वर्षभराने क्रिकेट कमबॅक केलं. मोहम्मद शमी याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बंगालकडून खेळताना मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यातून दमदार कमबॅक केलं. शमीने दोन्ही डावात उल्लेखनीय कामगिरी केली. इतकंच नाही, तर शमीने बॅटिंगनेही आपली क्षमता दाखवून दिली. शमीच्या या कामगिरीनंतर आता त्याची संघात निवड करण्यात आली आहे. शमीची आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी 20 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सुदीप केआर घरामी बंगालचं नेतृत्व करणार आहे. तसेच मोहम्मद शमी यालाही संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय ईशान पोरेल आणि इतर खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई आणि उत्तर प्रदेशनेही संघ जाहीर केला आहे.
श्रेयस अय्यर मुंबईचा कॅप्टन
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईकडून 17 नोव्हेंबरला संघ जाहीर करण्यात आला. अजिंक्य रहाणे नियमितपणे मुंबईचं नेतृत्व करतो. मात्र या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर याला कर्णधार करण्यात आलं आहे. त्यामुळे आता खांदेपालट करण्यात आली आहे हकालपट्टी? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तर दुसऱ्या बाजूला भुवनेश्वर कुमार हा उत्तर प्रदेशचं नेतृत्व करणार आहे.
बंगालच्या सामन्यांचं वेळापत्रक
बंगाल विरुद्ध पंजाब, शनिवार 23 नोव्हेंबर
बंगाल विरुद्ध हैदराबाद, सोमवार 25 नोव्हेंबर
बंगाल विरुद्ध मिझोराम, बुधवार 27 नोव्हेंबर
बंगाल विरुद्ध मध्यप्रदेश, शुक्रवार, 29 नोव्हेंबर
बंगाल विरुद्ध मेघालय, रविवार, 1 डिसेंबर
बंगाल विरुद्ध बिहार, मंगळवार, 3 डिसेंबर
बंगाल विरुद्ध राजस्थान, गुरुवार, 5 डिसेंबर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बंगाल टीम : सुदीप केआर घरामी (कर्णधार), मोहम्मद शमी, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सुदीप चॅटर्जी, शाहबाज अहमद, करण लाल, रिटिक चॅटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, शाकीर हबीब गांधी (विकेटकीपर), रणजोत सिंग खैरा, प्रन्यास रा बार्मन, अग्निव पॅन (विकेटकीपर), प्रदिप्ता प्रामाणिक, सक्षम चौधरी, इशान पोरेल, एमडी कैफ, सूरज सिंधू जैस्वाल, सायान घोष, कनिष्क सेठ आणि सौम्यदीप मंडळ.