IND vs SL, Asia Cup 2023 : “माझ्या नशिबात..”, श्रीलंका विरोधातील पराक्रमानंतर मोहम्मद सिराज याने व्यक्त केल्या भावना

| Updated on: Sep 17, 2023 | 6:13 PM

IND vs SL, Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. श्रीलंकेला 50 धावांवर रोखण्यात यश आलं आणि विजय सोपा झाला. सर्वोत्तम कामगिरीनंतर मोहम्मद सिराजने आपला आनंद व्यक्त केला आहे.

IND vs SL, Asia Cup 2023 : माझ्या नशिबात.., श्रीलंका विरोधातील पराक्रमानंतर मोहम्मद सिराज याने व्यक्त केल्या भावना
IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेचे 6 गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज याने व्यक्त केला आनंद, म्हणाला...
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत अंतिम फेरीत भारताला विजय सोप करून देण्यात मोहम्मद सिराज याचा मोलाचा वाटा राहीला. निम्म्याहून अधिक फलंदाजांना तंबूत पाठवून जेतेपदावर नाव कोरून दिलं. श्रीलंकेचा संपूर्ण संग 15.2 षटकं खेळला आणि सर्वबाद 50 धावा करू शकला. टीम इंडियासमोर विजयासाठी 51 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सहजरित्या गाठण्यात यश आलं. मोहम्मद सिराज याने 7 षटक टाकत 21 धावा देत 6 गडी बाद केले. यात एक निर्धाव षटक टाकलं. मोहम्मद सिराज याच्या क्रिकेट कारकिर्दितील सर्वोत्म कामगिरी आहे. तसेच यामुळे त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाचहून अधिक गडी बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यामुळे सर्वोत्तम कामगिरीनंतर मोहम्मद सिराज याने आपलं मत व्यक्त केलं.

काय म्हणाला मोहम्मद सिराज?

“स्वप्नासारखे वाटते. गेल्या वेळी मी त्रिवेंद्रम येथे श्रीलंकेविरुद्ध असेच केले होते. चार विकेट लवकर मिळाल्या, पण पाच विकेट मिळवता आल्या नाहीत. तुमच्या नशिबात जे असतं तुम्हाला मिळतं, आज हे लक्षात आलं. आज जास्त प्रयत्न केला नाही. मी गोलंदाजी करताना स्विंग पाहतो. मागील सामन्यांमध्ये तसं काही करता आलं नाही.पण आज स्विंग होत होता आणि मला आऊटस्विंगरने जास्त विकेट्स मिळाल्या.”, असं मोहम्मद सिराज याने सांगितलं.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. पाच फलंदाज शून्यावर तंबूत परतले. कुसल परेला, समाराविक्रमा, असलंका, शनाका आणि मथीशा पथिराना शून्यावर बाद झाले. तर. पाथुम निसंका 2, कुसल मेंडिस 17, धनंजय डिसिल्वा 4, दुनिथ वेल्लालगे 8, प्रमोद मदूशन 1 आणि दुशन हेमंथा याने नाबाद 13 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 6, हार्दिक पांड्याने 3 आणि बुमराहने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना