Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Australia vs India 2nd Test | दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी ‘या’ गोलंदाजाला कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार?

दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे.

Australia vs India 2nd Test | दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी 'या' गोलंदाजाला कसोटी मालिकेसाठी संधी मिळणार?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 10:46 AM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात (Australia vs India 2nd Test) टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील बॅटिंगदरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. शमीच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. शमीला या दुखापतीमुळे मालिकेबाहेर व्हावे लागले. यामुळे शमीच्या जागेवर कोणाला संधी मिळणार, अशा चर्चा क्रीडा वर्तुळात सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शमीच्या जागेवर मोहम्मद सिराजला कसोटी मालिकेत संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Mohammad Siraj is to get a chance in the Test series to replace the injured Mohammad Shami

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया ए विरोधातील सराव सामन्यादरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमीच्या जागी मोहम्मद सिराजला कसोटीमध्ये संधी मिळू शकते. जर सिराजला कसोटीत संधी दिली, तर त्याचे हे कसोटी पदार्पण ठरेल.

गोलंदाजीसाठी फारसे पर्याय नाहीत

टीम इंडियाचा हुकमाचा एक्का इशांत शर्मा एकही सामना न खेळता दुखापतीमुळे आधीच बाहेर झाला आहे. त्यात आता शमीला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर गोलंदाजीसाठीचे फारसे पर्याय नाहीत. सध्या टीम इंडियाकडे मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी हे दोघे बॅकअप खेळाडू म्हणून आहेत. तसेच थंगारासू नटराजन आणि कार्तिक त्यागीही आहेत. मात्र यांना संधी मिळण्याची फारशी शक्यता नाही.

दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल

टीम इंडियाने पहिला कसोटी सामना गमावला. त्यामुळे टीम इंडिया 0-1 ने पछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात अनेक खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. यामुळे दुसऱ्या सामन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ सातत्याने अपयशी ठरतोय. त्यामुळे शॉ ऐवजी संघात सलामीवीर म्हणून युवा शुभमन गिलला संधी मिळू शकते. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हनुमा विहारीच्या जागी रवींद्र जाडेजाला संधी दिली जाऊ शकते. तसेच विकेटकीपर म्हणून रिद्धीमान साहाच्या जागी ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये चान्स दिला जाऊ शकतो. पंतने ऑस्ट्रेलिया ए विरोधात सराव सामन्यात शतक लगावलं होतं.

नेतृत्वाची जबाबदारी रहाणेकडे

विराट पहिल्या सामन्यानंतर टीम इंडियासाठी उपलब्ध नसणार आहे. विराट लवकरच बाबा होणार असल्याने तो भारतात परततोय. यामुळे उर्वरित 3 कसोटींसाठी टीम इंडियाचे नेतृ्त्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला मिळू शकते.

दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळण्यात येणार आहे. हा दुसरा सामना बॉक्सिंग डे कसोटी असणार आहे. हा दुसरा सामना 26 डिसेंबरपासून खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया आधीच पिछाडीवर आहे. यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला चांगली कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे.

संबंधित बातम्या :

Icc Test Ranking : विराटची दादागिरी कायम, पुजाराची घसरण, आश्विनने कमावलं बुमराहने गमावलं

Australia vs India 2nd Test | दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार

Mohammad Siraj is to get a chance in the Test series to replace the injured Mohammad Shami

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.